चांदवडला मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:09+5:302021-05-29T04:12:09+5:30
शहरातील १० ते १२ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती शहर अभियंता शेषराव चौधरी, अनिल कुरे यांनी दिली. ...
शहरातील १० ते १२ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती शहर अभियंता शेषराव चौधरी, अनिल कुरे यांनी दिली. तसेच शहरातून वाहणाऱ्या गटारी, नाल्यांची साफसफाई करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. सदर दुरुस्ती व साफसफाईची कामे ही नगर परिषदेच्या निधीतून करण्यात येत आहेत. मार्च २०२० पासून जगभरामध्ये कोरोनाची महामारी पसरलेली आहे. त्याच्याविरुद्ध लढाईसाठी केंद्र व राज्य शासन यांनी लॉकडाऊन लावले होते. त्यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. मात्र, पावसाळापूर्वी नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.
------------------------------------------------------
कोट....
पावसाळापूर्वी शहरातील धोकादायक इमारतीचा सर्व्हे करून नगर परिषदेने संबंधित इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील नालेसफाई, रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहेत. जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही.
- अभिजित कदम, मुख्याधिकारी, चांदवड नगर परिषद
फोटो- २८ चांदवड नालेसफाई
चांदवड शहरातील पावसाळापूर्वी सुरू असलेली नालेसफाई मोहीम.
280521/28nsk_18_28052021_13.jpg
फोटो- २८ चांदवड नालेसफाई चांदवड शहरातील पावसाळ्यापूर्वी सुरू असलेली नालेसफाई मोहीम.