चांदवड : टोल कर्मचाटोलनाका त्वरित बंद करावा ऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 10:25 PM2020-05-03T22:25:25+5:302020-05-03T22:26:14+5:30
चांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटने जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मुख्य परिचलन अधिकारी, व्यवस्थापक व संबधीत अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील पुन्हा सुरू झालेला टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी संलग्न शिवक्रांती टोल कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रशांत ठाकरे, कार्याध्यक्ष शलिंद्र अहिरे यांनी जिल्हाधिकारी, टोल प्रशासन व प्रोजेक्ट डायरेक्टर एनएचआयए, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, मुख्य परिचलन अधिकारी, व्यवस्थापक व संबधीत अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
चांदवड येथे तालुक्यातून तसेच बाहेरून येणाºया कर्मचाºयांची संख्या जास्त आहे. तर चांदवड टोलनाका हा जनसंपर्काचे सर्वात मोठे साधन आहे. इतर उद्योगधंद्यापेक्षा टोलनाक्यावर येणाºया- जाणाºया वाहनाची संख्या त्याचप्रमाणे वाहनात येणाºया माणसांची संख्याही हजाराच्या संख्येत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टोलनाक्यावर संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे टोल कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली. दैवयोगाने तो बरा झाला असला तरी या सर्व पार्श्वभूमीवर टोलनाका त्वरित बंद करावा तसेच धुळे, सोनगीर, शिरपूर येथील टोल नाके जोपर्यंत लॉकडाुन आहे तोपर्यंत येथील टोलनाका लॉकडाउन करावा अशी मागणी टोल कर्मचाºयांनी केली आहे.
निवेदनावर रमेश ठाकरे, चंंद्रकांत जाधव, वैभव सोनजे, नीलेश कुलकर्णी, संदीप बडकस व सदस्यांच्या सह्या आहेत.संसर्ग होण्याची भीती