चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:27 AM2020-06-01T00:27:37+5:302020-06-01T00:27:52+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.

Chandwad traders hit by recession | चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

चांदवडला व्यावसायिकांवर मंदीचे सावट

Next
ठळक मुद्देकोरोना परिणाम : लग्नसराईलाही ब्रेक ; वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले

चांदवड :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्वच व्यवसाय बंद होते. काही दिवसांपूर्वी लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता मिळाली असली तरी बाजारपेठेत मंदीचे सावट दिसून येत आहे. यामुळे सर्वच व्यावसायिक हैराण झाले आहेत.
लॉकडाउनमुळे सर्वत्र उद्योगव्यवसाय मोडीत निघतील असे बोलले जात आहे. चांदवडमधील बाजारपेठ काहीअंशी उघडली असली तरी गिºहाईकच येत नसल्याची प्रतिक्रिया व्यापारी बोलून दाखवित आहेत. त्यामुळे सर्वच व्यापारी, उद्योग व्यावसायिक आर्थिक कोेंडीत सापडले आहो. कोरोनामुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. लॉकडाउन उठल्यानंतरही पुढे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच व्यवसाय धोक्यात आले असून, तालुक्याची अर्र्थव्यवस्था कोलमडली आहे. दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
आज उघडेल, उद्या उघडेल या भरवशावर दररोज नवनवीन माहिती येत असल्याने सर्वच व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शहरातील सलून, लॉण्ड्री, भांडीची दुकाने, कापड, रेडिमेड, सायकल दुकाने, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, ज्वेलर्स, हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, चहावाले, टॅक्सी, रिक्षा, टेम्पो चालक असे अनेक व्यवसाय बंद होते.
हातावर पोट असलेल्यांना लॉकडाउनच्या दुसºया-तिसºया टप्प्यात दैनंदिन खर्च भागवणेही जिकिरीचे झाले होते. अनेक व्यावसायिकांना कामगार व नोकरांना घरी बसून का होईना, पगार द्यावा लागला.
लॉकडाउनमुळे लग्नसराई गेली. त्यामुळे लग्नसराईवर अवलंबून असलेल्या घटकाचे नुकसान झाले. फोटोग्राफर,बॅण्डपथकातील वादक यांना उपासमारीची वेळ आली आहे. आठवड्याच्या बाजारावर अनेक जण आपला चरित्रार्थ चालवितात मात्र तोच बंद असल्याने तो कधी सुरु होईल अशी चिंता अनेक बाजारकरु व्यापाऱ्यांना लागली आहे. चांदवड शहरातील टॅक्सी, रिक्षा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे पुढील काळात पोटपाणी कसे भागणार का असा प्रश्न टॅक्सी, रिक्षाचालकांना सतावत आहे. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजीपाला, फळेविक्रीचा नव्याने व्यवसाय सुरु केला.
प्रशासनाच्या वतीने एका जागी बसून माल विक्री करता येत नाही तर घरपोहच व्यवसाय करुन तो किती यशस्वी झाला, असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. माल पडून राहणे, भाजीपाला पडणे, अशा अडचणी असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांंिगतले. एकंदरीत सर्वच व्यापारी हवालदिल झाले असून, कोरोना लवकरात लवकर संपो सर्व काही सुरळीत होवो अशी अपेक्षा व्यापारीवर्गाने बोलून दाखविली.

Web Title: Chandwad traders hit by recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.