चांदवडला वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:00 PM2020-06-09T21:00:46+5:302020-06-10T00:15:34+5:30
चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्त झाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे.
चांदवड : रविवारी आलेल्या वादळी वाºयामुळे शहर परिसरातील अनेक वीजखांब जमीनदोस्त
झाले, तर वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित आहे. महावितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत
करावा, अशी मागणी शिव वाहतूक सेनेचे फिरोजभाई पठाण यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच विजेचा दाबही कमी-अधिक होत आहे. यामुळे
घरातील विजेवर चालणारी उपकरणे खराब होण्याची भीती आहे. महावितरण कंपनीने त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच शहरातील बºयाच भागात लोंबकळत असणाºया वीजवाहिन्या, जीर्ण झालेले वीजखांब बदलावे, अशी मागणी पठाण यांनी केली आहे.