चांदवडला चंदन तस्करी, तिघांना अटक : कारसह बारा लाखाचा माल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:32 PM2018-01-05T15:32:49+5:302018-01-05T15:33:05+5:30
चांदवड - चंदनाची तस्करी करणाºया तीन जणांना कारसह सुमारे बारा लाखाचा माल ताब्यात घेतला. ही कारवाई नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर केल्याने पुन्हा एकदा गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहे.
चांदवड - चंदनाची तस्करी करणाºया तीन जणांना कारसह सुमारे बारा लाखाचा माल ताब्यात घेतला. ही कारवाई नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर केल्याने पुन्हा एकदा गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहे. शुक्र वारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चंदन तस्करी करणारे तीन जण कारने जात असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाल्याने त्यांनी चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर सापळा रचला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. ०२ /सी.एच. ४५०१ ही कार मालेगावकडून नाशिककडे चंदन घेऊन जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने या कारला अडवुन त्यातील तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून सुमारे चार लाख रु पये किंमतीचे चंदन , तर सात लाख किमंतीची स्व्होडा कार ताब्यात घेतली तर तात्या काळु पवार, निशांत मारोती पवार, राकेश मधुकर वाघ सर्व रा. मालेगाव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. चांदवड येथील सोमा टोल नाक्यावर मागील महिन्यात मोठयÞा प्रमाणात शस्त्रसाठा पकडल्यानंतर लगेच पोलिसांनी चंदन तस्करी पकडल्याने गुन्हेगाराचे चांगले धाबे दणाणले आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रविण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, कर्मचारी चेतन सवंस्तर, विजय कोरडे, किरण गांगुर्डे, कुणाल मराठे, संपत अहिरे यांच्या पथकाने केली.