चांदवडनजिक अ‍ॅम्ब्लुन्सची स्वीफ्ट कारला धडक एक ठार ,पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:53 PM2018-11-15T16:53:38+5:302018-11-15T16:54:47+5:30

चांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी झाला आहे.

 Chandwadian Ambulance swift car killed, five injured | चांदवडनजिक अ‍ॅम्ब्लुन्सची स्वीफ्ट कारला धडक एक ठार ,पाच जखमी

चांदवडनजिक अ‍ॅम्ब्लुन्सची स्वीफ्ट कारला धडक एक ठार ,पाच जखमी

Next
ठळक मुद्देचांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी


चांदवड -चांदवड येथील मुंबई आग्रारोडवरील श्री. रेणुकादेवी मंदिराच्या जवळ चांदवडकडून देवी दर्शनासाठी जाणाऱ्या स्वीफ्ट कारला समोरुन येणाºया अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरोने धडक दिल्याने स्वीफ्टमधील एक महिला ठार तर अन्य चार जण जखमी झाले.तर अ‍ॅम्ब्युलन्समधील एक जण जखमी झाला आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चांदवडकडून देवीमंदिराकडे दर्शनासाठी जाणारी नाशिक येथील स्वीफ्ट कार क्रमांक एम.एच.१५/ सी.एम.१५१२ ही मंदिराकडे वळण घेत असतांना मालेगावकडून येणारी अ‍ॅम्ब्युलन्स बोलेरो गाडी क्रमांक यु.पी. / ८५/ बी.टी.८६८ ही आग्रा येथून पुणे येथे मृतदेह घेऊन जात होती तीने स्वीफ्ट कारला धडक दिल्याने स्वीफ्टमधील मंगल सुधाकर सोनवणे (७०) रा.नाशिक ही महिला जागीच ठार झाली तर अन्य जखमीमध्ये विजय काशीनाथ बोरसे (६०) , यमा अनिल शिंपी (२६), निवृत्ती राहुल जगताप (३५), प्रणव राहुल जगताप सर्व रा. नाशिक हे जखमी झाले तर अ‍ॅम्ब्लन्समधील प्रितम शिरीष काबय (३५) रा.पुणे हा ही जखमी झाला. जखमीना सोमा कंपनीच्या गस्ती पथकाने व स्थानिक नागरीक व पोलीसांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले तर त्यांचेवर औषधउपचार करण्यात आले.चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सलीम शेख हे करीत आहेत.

Web Title:  Chandwadian Ambulance swift car killed, five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.