चांदवडला वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 07:05 PM2018-09-07T19:05:55+5:302018-09-07T19:06:45+5:30
चांदवड येथील वीज कर्मचारी अधिकारी संघटना कृती समितीच्या वतीने वीज विभागीय कार्यालयाच्या आवारात प्रारंभी द्वारसभा झाली. त्यानंतर वीज कर्मचारी व अधिकाºयांवर ग्राहकाकडून होणाºया हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच शासनाकडून कर्मचाºयांना सरंक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकारी अभियंता अजित वाडेकर, चांदवडचे नायब तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना निवेदन दिले.
येवला तालुक्यातील देवरगाव येथे ग्राहकाकडून अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव यांच्यावर भ्याड हल्ला झाला तसेच रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. मालेगाव येथील दहीवाळ कक्षात पवार यांना ग्राहकाकडून झालेली शिवीगाळ दमबाजी , दाभाडी उपविभागात दुबे यांनी वीजचोरी पकडली म्हणून झालेली धक्काबुक्की तसेच सिन्नर उपविभागात पाथरेकक्षात महिला कर्मचारी स्वाती वणसे यांना झालेल्या शिवीगाळ व जेलरोड कक्ष कार्यालयात सहाय्यक अभियंत्याामोर ग्राहकाने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या ठिकाणी सतत कर्मचाºयांवर होणाºया हल्ल्यामुळे वीज कर्मचारी व अधिकारी यांचे खच्चीकरण होत आहे. या विघातक प्रवृत्तीच्या लोकांना कठोर शासन करावे अशी मागणी द्वारसभेत व निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर सर्कल सचिव दीपक गांगुर्डे, महेश वाळुंज, पांडूरंग शिंदे,अमोल काळे, व्ही.के.जाधव, हिरामण शिंदे, महेश तळेकर, वीज कामगार महासंघ अध्यक्ष विष्णू ठाकरे,अनिल चव्हाण, जगन चव्हाण, मनोज कुंभार्डे, निकम, राहुल शिंदे, नीलेश नागरे, प्रल्हाद आव्हाड, गौतम अहिरे, एकनाथ कापसे,भावेश मैंद आदिसह कर्मचारी अधिकारी यांच्या सह्या आहेत.