चांदवडला शिक्षक समितीचा वर्धापनदिन साजरा
By admin | Published: July 25, 2014 11:08 PM2014-07-25T23:08:40+5:302014-07-26T00:51:57+5:30
चांदवडला शिक्षक समितीचा वर्धापनदिन साजरा
चांदवड : राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५२वा वर्धापनदिन चांदवड शाखेच्या वतीने उत्साहात संपन्न करण्यात आला.
यावेळी शिवचरित्रावर प्रा. यशवंत गोसावी यांनी मार्गदर्शन करताना, जिजाऊंनीजसे शिवरायांवर संस्कार केले, तसेच आजच्या
मातांनी आपल्या बालकांवर संस्कार करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी मंत्रिमंडळात सर्व जाती धर्मांतील लोकांना स्थान दिल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे उपस्थित होते. केदू देशमाने यांनी संघटनेच्या चळवळीविषयी माहिती दिली. चांदवड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कोळी यांनी, अशा उपक्रमाची शिक्षण व्यवस्थेला गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी साहेबराव पवार, शिवाजी शिंदे, किरण दाते, संजय खांगळ, रमेश अहेर, पांडुरंग कर्डिले, देवीदास शेलार, जगन्नाथ घुमरे, वाल्मीक सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)