चांदवडला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:42 AM2019-03-16T01:42:04+5:302019-03-16T01:43:51+5:30
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चांदवड तालुक्यातील शिरूर येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध सेवन आत्महत्या केली. जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे.
नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चांदवड तालुक्यातील शिरूर येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध सेवन आत्महत्या केली. जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे. महसूल खात्याकडून शेतकºयाच्या नावावर कर्ज होते किंवा कसे याची माहिती गोळा केली जात आहे. यंदाही शेतकºयांची आत्महत्या थांबलेल्या नाहीत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या आहेत. मंगळवारी योगेश रमण देशमाने (३५) यांनी विषारी औषध सेवन केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच निधन झाले. शिरूर येथे त्यांच्या नावे एक हेक्टर ५० आर शेतजमीन आहे. त्यांच्या नावावर कर्ज होते किंवा कसे याची माहिती घेतली जात आहे.