चांदवडचा जम्बो ऑक्सिजन प्लांट अखेर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:07+5:302021-09-23T04:16:07+5:30

चांदवड (महेश गुजराथी) - येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जम्बो ऑक्सिजन जनरेट प्लांटचे काम पूर्ण झाले असून लोकार्पण ...

Chandwad's jumbo oxygen plant finally completed | चांदवडचा जम्बो ऑक्सिजन प्लांट अखेर पूर्ण

चांदवडचा जम्बो ऑक्सिजन प्लांट अखेर पूर्ण

Next

चांदवड (महेश गुजराथी) - येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जम्बो ऑक्सिजन जनरेट प्लांटचे काम पूर्ण झाले असून लोकार्पण सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन जनरेट प्लांट शासनाने मंजूर केले. त्यातील चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जम्बो ऑक्सिजन जनरेट प्लांटचे काम पूर्ण झाले असून आता हा प्लांट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. उद्घाटन कधी व कोणाच्या हस्ते होणार याकडे चांदवड तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. अखेर या लोकार्पणाचा मुहूर्त सापडला. या प्लांटची देखभाल व दुरुस्ती व चालविण्यासाठी तज्ज्ञ असे तंत्रज्ञ अद्याप उपलब्ध नसल्याची माहिती हाती आली आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन रुग्णांच्या सेवेसाठी गेल्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासल्याने जिल्ह्यात सर्वत्र ऑक्सिजन प्लांट मंजूर केले असले तरी या प्लांटच्या हाताळणीचा प्रश्न मात्र ऐरणीवरच असल्याचे दिसून येत आहे.

चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट प्रारंभी वीज वितरण कंपनीच्या जोडणीमुळे रखडला. पुढे ती जोडणी पूर्ण झाली. आता प्लांट कार्यान्वित झाला असून लोकार्पण होणार आहे. पीएस.ए. ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे नाव असून लक्ष्मी सर्जिकल्स या कंपनीने उभारणी केली आहे. ऑटोमॅटीक प्लांट असून पूर्ण इलेक्ट्रिकवर चालतो. साठा भरला की त्या टाकीत सात ते दहा जम्बो सिलिंडर भरतात. तो कायम ऑक्सिजन तयार करतो. एका दिवसाला पन्नास ते साठ जम्बो सिलिंडर तयार करण्याची क्षमता असते. टाकीत पन्नास हजार लीटर ऑक्सिजन तयार होतो.

------------------

प्लांटची क्षमता

पन्नास हजार लीटर ऑक्सिजन

हा प्लांट लाईट गेला तरी नंतर लाईट येईपर्यंत पन्नास हजार लीटर ऑक्सिजन वापरु शकतो. साधारण दहा लीटर क्षमतेने जरी एका रुग्णावर दिला तरी पन्नास रुग्ण या पन्नास हजार लीटर ऑक्सिजनवर तग धरु शकतात अशी क्षमता या जम्बो ऑक्सिजन प्लांटची आहे. त्यामुळे दिवसभरात चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दररोज पन्नास हजार लीटर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होणार असल्याची माहिती चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

(२२ चांदवड प्लांट)

220921\22nsk_20_22092021_13.jpg

२२ चांदवड प्लांट

Web Title: Chandwad's jumbo oxygen plant finally completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.