चांदवडचा सोमवारचा आठवडेबाजार बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 07:18 PM2021-03-15T19:18:09+5:302021-03-16T00:30:48+5:30
चांदवड - येथील सोमवारचा आठवडे बाजार कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी अभिजीत कदम यांनी दिली. दरम्यान या दुसऱ्या सोमवारच्या आठवडेबाजारास तालुक्यातील भाजीविक्रेते, व व्यावसाईकांनी चांगला प्रतिसाद देत बाजार भरलाच नाही.

दरम्यान सकाळी व दुपारी काही बाजारकरू फळविक्रेते, व्यावसायिक यांनी बाजारात दुकाने थाटली होती. मात्र नगरपरिषदेच्या अधिकारी पवनकुमार कस्तुरे, संदीप महाले, संजय गुरव, खंडू वानखेडे व कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी ही दुकाने उचलल्याने व्यापारी व नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये हुज्जत झाल्याचे प्रकार दिसून आले. तर काही व्यापाऱ्यांना नगरपरिषदेने दंड करून त्यांना दुकाने हलविण्यास भाग पाडले.
सोमवारी रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते व फळविक्रेते इतर व्यावसायिकांनी बसू नये कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा शासन नियमाचे पालन न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही कदम यांनी पत्रकान्वये कळविले आहे. (१५ एमएमजी २)