चांदवडला विहिरींनी गाठला तळ

By admin | Published: March 2, 2016 10:44 PM2016-03-02T22:44:42+5:302016-03-02T22:46:05+5:30

पाणीटंचाई : नागरिक हैराण; तालुक्यातील जलाशय कोरडेठाक

Chandwadwell reached the well | चांदवडला विहिरींनी गाठला तळ

चांदवडला विहिरींनी गाठला तळ

Next

महेश गुजराथी  चांदवड
सातत्याने दुष्काळ तालुक्याच्या पाचवीला पूजलेला. पाणीटंचाईवर मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर कायमस्वरूपी ४४ गाव नळयोजनेसारखी नळ योजना प्रभावीपणे राबविल्यास या तालुक्यातील टॅँकरमुक्ती खऱ्या अर्थाने होईल.
तालुक्यातील अनेक गावांना पावसाळ्यात पाऊस न पडल्याने आज पाणीटंचाईचे संकट भासत आहे. तालुक्यातील बरीच जलाशये कोरडीठाक पडली आहेत. त्यातील खोकड तलाव, केद्राई, वागदडी धरणांची आता उन्ह वाढू लागल्याने दमछाक होत आहे. तर तालुक्यात खासगी व सार्वजनिक विहिरी या सुमारे ३००च्या आसपास असून, पावसाळ्यात पाणी न झाल्याने शेतीला काय तर पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील काही भागात चांगला तर काही भागात काहीच पाऊस न झाल्याने दरवर्षी टॅँकरची मागणी वाढत असते. गेल्यावर्षी २७ गावे, १९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये खर्च या टॅँकरद्वारे शासनाला करावा लागतो तर गेल्या वर्षी अगदी जून ते जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाई असल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे.
वडनेरभैरव व वडाळीभोई भागात बऱ्यापैकी पाणी असल्याने तेथील समस्या एवढी बिकट नाही मात्र पुर्वपट्टा त्यात दरेगाव , निमोण या गावांना गेल्या दोन वर्षीपर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र या गावांना ४२ गाव नांदगावसह नळपाणीपुरवठा योजना झाल्याने या भागातील १७ गावांचा पाणीप्रश्न काही अंशी कमी झाला आहे. दरेगाव व निमोण भागातील पाणीटॅकर बंद झाले आहेत मात्र नाग्या साक्या धरणातील पाणीसाठा बेतात असल्याने येथेही या वर्षी टंचाई जाणवेल असा अंदाज आहे. तर चांदवड तालुक्यातील ४४ गाव नळपाणीपुरवठा योजनेतील गावाची संख्या वाढून ती संख्या आता ६० वर गेली आहे. यंदा मात्र पाऊस कमीच असल्याने ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल , मे, जुन मध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाई जाणवेल तर चारा टंचाई जाणवेल असा अंदाज बळीराजा व्यक्त करीत आहेत तर काही भागातील विहीरी व बोअरवेलने आतापासूनच तळ गाठला आहे.
सध्या चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीच्या लक्ष्मीनगर, मेसनखेडे येथील जेजुरे वस्ती , मेसनखडे खुर्द येथील माळवी वस्ती तसेच पुर्वभागातील उसवाड, राहुड , तर तळेगावरोही गटातील बरीच गाव व दुगाव गटातील बरीच गावे पाणी टंचाईचा सामना करतील असा अंदाज आहे. चांदवड तालुक्याला वरदान ठरणारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणांची ४४ गाव नळयोजनेचे आता ६० गावे अशी संख्या झाली असून ही पाईप लाईन धोंडबे ते चांदवड पर्यंत जुनी झाल्याने अनेक वेळा फुटते तर काही ठिकाणी पाणी चोरीच्या घटना घडत असल्याने बऱ्याच गावांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.अशी परिस्थिती आहे.

Web Title: Chandwadwell reached the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.