आणेवारीचे निकष बदलून दुष्काळ जाहीर करा
By admin | Published: October 20, 2015 10:44 PM2015-10-20T22:44:47+5:302015-10-20T22:46:14+5:30
इगतपुरी : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांशी पाणीटंचाईबाबत चर्चा
इगतपुरी : तालुक्यातील महसूल विभागातील सहा मंडळनिहाय पावसाची टक्केवारी कमी जास्त असून मोठी तफावतीची आहे. त्याच चुकीच्या पद्धतीनुसार सरासरी पर्जन्यमान ठरवून तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी निकष बदलावेत अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेऊन शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आकडेवारी पाहता यामध्ये मोठी तफावत आहे. परंतु आणेवारी लावताना पूर्ण तालुक्याच्या पावसाचे प्रमाण धरले जाते. परिणामी तालुक्याची आणेवारी कमी असताना ५० टक्क्यांपेक्षा जास्त धरली गेल्याने शेतकरी वर्गावर अन्याय होतो. शासनाने हे निकष बदलून तालुक्याची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत लावून इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष पांडुरंग बऱ्हे, महेश श्रीश्रीमाळ, भाऊसाहेब धोंगडे, अण्णासाहेब डोंगरे, मुन्ना शेख, मुन्ना पवार, पांडुरंग बऱ्हे, भाऊसोहब कडभाने, शहराध्यक्ष मुन्ना पवार, कैलास चौधरी, महेश श्रीश्रीमाळ, नंदुपाटील गाडवे, खंडेराव धांडे, संजय गुळवे, जयराम गव्हाणे, राजाराम गोवर्धने, भागीरथ भगत, अलीम शेख, तौफीक गलेरिया आदि उपस्थित होते.