अंगणवाड्यासंदर्भातील निकष बदलावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:39 AM2018-06-18T00:39:51+5:302018-06-18T00:39:51+5:30
शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने अंगणवाड्या चालविण्यासाठी प्रचलित निकषात बदल करून वीस ते चोवीस मुले असतील तरीही अंगणवाड्या चालूच ठेवाव्यात, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे.
नाशिक : शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने अंगणवाड्या चालविण्यासाठी प्रचलित निकषात बदल करून वीस ते चोवीस मुले असतील तरीही अंगणवाड्या चालूच ठेवाव्यात, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे. महापालिकेच्या प्रस्तावामुळे अडचणीत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी नुकतीच आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली होती. त्याअनुषंगाने फरांदे यांनी महापौरांना पत्र पाठवून याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. महापालिका अधिनियमानुसार दि. १० डिसेंबर ९३ रोजी ठराव क्र .१७३ करण्यात आला. त्यानुसार शहरांतील अंगणवाड्यांमधील पटसंख्या ३५ ते ४० असणे आवश्यक आहे. मात्र अनेक अंगणवाड्यांमध्ये ही पटसंख्या २० ते २४ च्या असल्याच्याच घरात असल्याने महापालिकेने या अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे टाळण्यासाठी महासभेत ठरवण्यात आलेली पटसंख्या ही कमी करून किमान पटसंख्या २० ते २४ करण्याचा ठराव महासभेत मांडण्यात येऊन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती आमदार फरांदे यांनी केली आहे.