अनकाई ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:59 PM2021-01-21T18:59:37+5:302021-01-21T19:01:20+5:30
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती पॅनलला या निवडणूकीत अवघी एक जागा मिळाल्याने दारूण पराभव स्विकारावा लागला.

वार्ड निहाय विजयी उमेदवार असे - वार्ड क्र. १ : प्रतिभा बोराडे, वैशाली गांगुर्डे. वार्ड क्र. २ : राजाराम पवार, नगीना कासलीवाल, पंचफुला दळवी. वार्ड क्र. ३ : अल्केश कासलीवाल, शिवम अहिरे, सविता टिटवे. वार्ड क्र. ४ : डॉ. प्रितम वैद्य, सागर सोनवणे, शोभा जाधव.
निवडणूकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. प्रारंभी स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन केले. गाव विकासासाठी प्रामाणीक प्रयत्न करणार असून निवडणूक काळात दिलेल्या वचनांचीपूर्ती केली जाणार असल्याचे नवनिर्माण विकास पॅनलचे कासलीवाल यांनी,या प्रसंगी बोलतांना सागितले. नवनिर्माण विकास पॅनलचे नेते अल्केश कासलीवाल यांनी मनोगतात सांगितले.
या प्रसंगी बाबुलाल कासलीवाल, त्र्यंबक बढे, शांताराम पवार, चंद्रभान व्यापारे, दत्तू सोनवणे, किरण बढे, बाळु बोराडे, अशोक बोराडे, मारूती वैद्य, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, तुषार अहिरे, बाळू चव्हाण, मेहबूब पठाण, राजू परदेशी, मुकेश परदेशी, अप्पा सोनवणे, भगवान जाधव, सागर परदेशी, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते.
अनकाई ग्रामपंचायतीत नगीना कासलीवाल, अल्केश कासलीवाल हे माय-लेक विजयी झाले आहेत. तालुक्यातील ही पहिली घटना आहे.