पाटोद्यात सत्ता परिवर्तन, प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:21 PM2021-01-19T22:21:15+5:302021-01-20T01:30:03+5:30
पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे.
पाटोदा : संपूर्ण येवला तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून असलेल्या पाटोदा ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली असून प्रस्थापितांना धक्का देत सत्ता परिवर्तन घडले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेंगाणे, साहेबराव आहेर, मारुती घोरपडे, रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास पॅनलने बारा जागा जिंकत सत्ता काबीज केली तर सत्ताधारी शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे माजी सभापती पुंडलिक पाचपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी रामेश्वर ग्रामविकास पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. तर वॉर्ड क्रमांक एक (दहेगाव) मधून परिवर्तन पॅनलने एक जागा जिंकत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे, प्रभाग क्रमांक एक (दहेगाव पाटोदा) संतोष लक्ष्मण दौंडे, सुनीता ज्ञानेश्वर आहेर, प्रभाग दोन :-उस्मानभाई कादरभाई शेख, खंडू बाबू पवार, जयश्री योगेश बोराडे, प्रभाग तीन :- प्रताप अन्साराम पाचपुते अझरुद्दीन अय्युब पठाण, सुभद्रा नंदकुमार मेंगाणे, प्रभाग चार :- मोनाली कृष्णा घोरपडे, गणेश बैरागी, वैशाली सोनावणे, प्रभाग पाच (बिनविरोध ) :- मंगला प्रभाकर बोरनारे, सविता अंकुश बोराडे, राहुल दिगंबर वरे, प्रभाग सहा :- रईस नुरमोहम्मद देशमुख, हिराबाई सुकदेव वाघ, कौशाबाई कारभारी जाधव. जनसेवा ग्रामविकास विजयासाठी रमेश काका बोरनारे प्रभाकर बोरनारे शिवाजी वैराळ, पोपट धनवटे, रियाज मुलाणी, कारभारी बोरनारे, साहेबराव पाचपुते, मच्छिंद्र आहेर, खानमहंमद पठाण, विलास पवार, वाल्मीक आहेर, प्रवीण घोरपडे, शिवराम जाधव, अंकुश बोराडे, माधव जाधव, अशोक बोराडे, श्रीधर गायकवाड, एजाज देशमुख, कादिरभाई देशमुख, मुन्नाबाबा देशमुख विठ्ठल चौघुले, संजय जाधव, कैलास मेंगाणे, कारभारी बोराडे, जमादार देशमुख, प्रल्हाद बोरनारे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला.
प्रमुख पराभूत उमेदवार :- माजी उपसरपंच साहेबराव महादू आहेर, माजी सरपंच सूर्यभान गंगाधर नाईकवाडे, माजी पंचायत समिती सभापती पुंडलिक पाचपुते, बाबासाहेब पवार, संपत बोरनारे.