१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

By अझहर शेख | Published: January 16, 2024 06:29 PM2024-01-16T18:29:46+5:302024-01-16T18:30:42+5:30

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे.

Changed 'location' of police inspectors in charge of 10 police stations in nashik | १० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

१० पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरिक्षकांचे ‘स्थान’ बदलले; लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयांतर्गत मोठे फेरबदल केले आहे. सरकारवाडा, गंगापुर, पंचवटी, आडगाव, सातपुर, इंदिरानगर, उपनगर, आडगाव, देवळाली कॅम्प, म्हसरूळ या पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच दुय्यम निरिक्षकांसह सहायक निरिक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. एकुण २४ निरिक्षक व २७ सहायक निरिक्षकांची आदलाबदल केली गेली आहे.

स्थानिक व तीन वर्षे पुर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे. नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील बदल्या झाल्यानंतर आयुक्तालयांतर्गतही बदल्या करण्यात आल्या आहेत. कर्णिक यांच्या अध्यतेखाली पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (दि.१६) काढण्यात आले. बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमांचाही यावेळी विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विविध विशेष शाखा व पथकांचेही प्रभारी अधिकार बदलले आहेत.

पोलिस निरीक्षक : कोठून : कोठे
सुरेश आव्हाड - आर्थिक गुन्हे - सरकारवाडा

सोहन माछरे - वाहतूक युनिट-२ - पंचवटी
प्रवीण चव्हाण - देवळाली कॅम्प - आडगाव

जितेंद्र सपकाळे - पंचवटी - उपनगर
सुभाष ढवळे - वाहतूक शाखा युनिट-१ - म्हसरूळ

रणजित नलवडे - गुन्हे शाखा-२ - सातपूर
तृप्ती सोनवणे - भद्रकाली - गंगापूर

दिलीप ठाकूर - सरकारवाडा - अंबड
अशोक शरमाळे - आर्थिक गुन्हे - इंदिरानगर

अनिल शिंदे - पंचवटी - गुन्हे शाखा युनिट-२
प्रमोद वाघ - अंबड - आर्थिक गुन्हे शाखा

नितीन पगार- इंदिरानगर - आर्थिक गुन्हे शाखा
श्रीकांत निंबाळकर - गंगापूर - विशेष शाखा

गणेश न्हायदे - आडगाव - विशेष शाखा
पंकज भालेराव - सातपूर - आर्थिक गुन्हे

विद्यासागर श्रीमनवार - खंडणी विरोधी पथक - देवळाली कॅम्प
सुरेखा पाटील - विशेष शाखा - सरकारवाडा दुय्यम निरिक्षक

संजय पिसे - आर्थिक गुन्हे - भद्रकाली दुय्यम निरिक्षक
ज्योती आमणे - महिला सुरक्षा - पंचवटी दुय्यम निरिक्षक

राकेश हांडे - वाहतूक - वाहतूक शाखा युनिट- १
दिवाणसिंग वसावे - एनडीपीएस - वाहतूक युनिट-२
महेंद्र चव्हाण - विशेष शाखा - बीडीडीएस
प्रकाश पवार - वाचक शाखा - नियंत्रण कक्ष
-----
२७ सहायक निरीक्षकांचीही बदली
शहरातील २७ सहायक पोलिस निरीक्षकांच्याही जबाबदारीत बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत, नाशिकरोडचे हेमंत फड गुन्हे शाखेत, वाहतूक शाखेतील यतीन पाटील अंबड पोलीस ठाण्यात तर गुन्हे शाखेचे किरण रौंदळ यांची अंबडला, प्रवीण सूर्यवंशी नाशिकरोडला तर वसंत खतेले, साजीद मन्सुरी व प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखेत, भद्रकालीचे किशोर खांडवी वाहतूकमध्ये, गंगापूरचे नरेंद्र बैसाने उपनगरला तर मुंबई नाक्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Changed 'location' of police inspectors in charge of 10 police stations in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.