कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे न्यायालयांच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:31+5:302021-03-31T04:14:31+5:30
सर्व न्यायाधीश दोन्ही सत्रात हजर राहतील मात्र कोर्टातील कर्मचारी पन्नास टक्के हजर राहतील. ज्यांचे काम चालणार असेल त्याच ...
सर्व न्यायाधीश दोन्ही सत्रात हजर राहतील मात्र कोर्टातील कर्मचारी पन्नास टक्के हजर राहतील. ज्यांचे काम चालणार असेल त्याच वकील व पक्षकारांना कोर्ट हॉलमध्ये बसता येईल तसेच एखादा पक्षकार किंवा वकील एखाद्या प्रकरणात हजर राहिला नाही तर त्याच्या विरोधात ऑर्डर केली जाणार नाही. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. पहिल्या सत्रात पुरावा घेण्याचे काम प्राधान्याने होईल. दुसऱ्या सत्रात वकिलांचे युक्तिवाद व इतर कामे होतील. कामाशिवाय वकील व पक्षकार यांनी कोर्टात गर्दी करू नये असे परिपत्रक उच्च न्यायालय समन्वय समिती व न्यायाधीश यांनी सध्याची कोविडची परिस्थिती बघता काढले आहे. हे परिपत्रक महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांना लागू राहणार असल्याची माहिती नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी दिली.