वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् ५८ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:40+5:302021-09-15T04:18:40+5:30

नाशिक : अनेक प्रकारे वीज चोरी करून महावितरणला फसविले जाते. त्यातील काही प्रकार उघडकीस येतात, तर मीटरमधील फेरफार केलेला ...

Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 58 lakh! | वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् ५८ लाखांचा दंड!

वीज मीटरमध्ये फेरफार; फौजदारी गुन्हा अन् ५८ लाखांचा दंड!

Next

नाशिक : अनेक प्रकारे वीज चोरी करून महावितरणला फसविले जाते. त्यातील काही प्रकार उघडकीस येतात, तर मीटरमधील फेरफार केलेला लवकर लक्षात येत नाही. असे असले तरी महावितरणच्या पथकाकडून अशा चोऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जात असल्याने नाशिक शहर आणि जिल्ह्यात २११ प्रकरणांमध्ये ५८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक शहर-१ आणि शहर-२ त्यामध्ये तीन तालुक्यांचा विचार करता या भागातून मीटरमध्ये फेरफार केल्याची प्रकरणे उजेडात आणली गेली आहेत. त्या माध्यमातून महावितरणने संबंधितांना समज दिली आहेच, शिवाय दंडात्मक कारवाई करून गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. वीज कायदा २००३ नुसार कलम १३५, तसेच १३८ अन्वये संंबधितांवर कारवाई केली जाते. त्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबर दंडात्मक कारवाईतून वीज चोरीची वसुलीदेखील केली जाते.

--इन्फो--

आठ महिन्यांतील कारवाई

एप्रिल ते ऑगस्ट २०२१

ग्राहक संख्या : २२१

वसूल दंड : ५८.६० लाख

--इन्फो--

फौजदारी गुन्हा आणि जबरी दंड

वीज कायदा २००३ नुसार कलम १३५, तसेच १३८ अन्वये संंबंधितांवर कारवाई केली जाते. त्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरेाबर दंडात्मक कारवाईतून वीज चोरीची वसुलीदेखील केली जाते. त्यानुसार दंडात्मक कारवाईची, तसेच शिक्षेची तरतूद असली तरी अधिकृत तडजोड करून ग्राहकाला संधीदेखील दिली जाते.

--इन्फो-

वीज चोरीसाठी अशीही चलाखी

१) वीज चोरी करण्यासाठी वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. त्यामध्ये मीटरमध्ये वायर टाकून मीटर कमी रीडिंग दाखविण्यासाठी फेरफार केला जातो.

२) वीज मीटर टॅप करूनदेखील अनेक जण मीटर रीडिंगमध्ये फेरफार करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

३) काही ग्राहक मीटरमध्ये एक्सरे फिल्मचा तुकडा टाकून मीटरमध्ये फेरफार करतात.

--कोट--

ग्राहकाने निममानुसारच वीज वापरणे आवश्यक असून, अधिकृत जोडणी घेतली पाहिजे. वीज चोरी होत असल्याचे उघड झाल्यास संबंधितांवर वीज कायदा २००३ नुसार सेक्शन १३५, तसेच सेक्शन १३८ नुसार कारवाई केली जाते. विद्युत पथकाच्या माध्यमातूनदेखील वीज चोरी शोधण्याचे काम केले जाते.

ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता

Web Title: Changes in electricity meters; Criminal offense and fine of Rs 58 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.