दुसऱ्या सोडतीपूर्वी ऑनलाईन अर्जात करता येणार बदल ; जाणीवपूर्वक खोटे पत्ते देणाऱ्यांना संधी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:10 PM2019-05-27T15:10:35+5:302019-05-27T15:16:14+5:30
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार पहिल्या फेरीत समोर आला होता. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या पालकांनी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे.
नाशिक : आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते व चुकीच्या जन्मतारखा नोंदविल्याचा प्रकार पहिल्या फेरीत समोर आला होता. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ज्या पालकांनी ऑनलाईन अर्जात खोटे पत्ते नोंदवले आहे अशा पालकांना अर्जात बदल करण्याची संधी नाकारली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील पहिली लॉटरी ८ एप्रिल रोजी काढण्यात आल्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसºया सोडतीपुर्वी पालकांना आॅनलाईन अर्जांमध्ये दुरुस्ती व फेरबदल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला परंतु निश्चित (कन्फर्म) केला नाही. त्यांना तो निश्चित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ज्या पालकांना लॉटरी लागली नाही. अशा पालकांना त्यांचे गुगल लोकेशन चुकले असल्यास ते दुरु स्त करा येणार आहे. गुगल लोकेशन दुरुस्त केल्यानंतर शाळांची निवड नव्याने करणे आवश्यक आहे. मात्र अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची जन्मतारीख व नावात बदल करता येणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले असून ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली परंतु अंतराच्या अडचणीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही. अशाच पालकांच्या तक्रारीची खात्री पडतााळणी समितीने करणे व पालकांची चूक किंवा तांत्रिक चूक असल्यास गुगल लोकेशन व शाळा निवडीत दुरुस्ती करण्याच्या सूचना संचालनालयाने केल्या आहेत . मात्र ज्या पालकांनी घराचे अंतर ३ किमी पेक्षा अधिक असतांना जाणीवपूर्वक १ किमीच्या आत दाखविले अहे. अशा पालकांना पडताळणी समितीने अपात्र ठरविले आहे. अशा पालकांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.