स्मार्ट रोडसाठी वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:27 IST2020-08-19T22:39:41+5:302020-08-20T00:27:04+5:30

नाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान हॉस्पिटलपर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोड तयार केला जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढली आहे.

Changes in transport routes for smart roads | स्मार्ट रोडसाठी वाहतूक मार्गात बदल

स्मार्ट रोडसाठी वाहतूक मार्गात बदल

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मॅरेथॉन चौक ते लोकमान्यनगर आणि दुसऱ्या टप्प्यात लोकमान्य नगर ते केकान हॉस्पिटल असे रस्त्याचे काम होणार

नाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान हॉस्पिटलपर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोड तयार केला जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढली आहे.
पहिल्या टप्प्यात मॅरेथॉन चौक ते लोकमान्यनगर आणि दुसऱ्या टप्प्यात लोकमान्य नगर ते केकान हॉस्पिटल असे रस्त्याचे काम होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मॅरेथॉन चौकाकडून केकान हॉस्पिटलपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, केकान हॉस्पिटल, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका सिग्नलमार्गे वाहतूक गंगापूर रोडने इतरत्र वळवण्यात आली आहे.

Web Title: Changes in transport routes for smart roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.