काम चुकारांच्या करणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:16 PM2017-08-18T23:16:56+5:302017-08-19T00:15:13+5:30

दोडी ग्रामीण रुग्णालयातील कामचुकार कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.

Changes will work | काम चुकारांच्या करणार बदल्या

काम चुकारांच्या करणार बदल्या

Next

सिन्नर : दोडी ग्रामीण रुग्णालयातील कामचुकार कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रुग्ण व नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. सर्वाधिक तक्रारी कर्मचाºयांविरोधात करण्यात आल्याने डॉक्टरांखेरीज कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दोडी ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यासाठी उशीर केला जातो, दूरध्वनी उचलले जात नाहीत, सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होतात, काही कर्मचारी रात्री दारू पिऊन येतात, पंखे बंद आहेत, लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली जात नाही, अशा अनेक तक्रारी यावेळी उपस्थितांनी मांडल्या. शालेय तपासणीसाठी एनआरएचएमचे सहा डॉक्टर व कर्मचाºयांचे पथक आहे. यातील काहीजण मुख्यालयाकडे फिरकत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोडी ग्रामीण रुग्णालयातील समस्यांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र दोन महिन्यानंतरही त्याची माहिती देण्यात आली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी सांगितले. दैनंदिन नोंदीचे मस्टर बुक भरले जात नसल्याबाबत सांगळे यांनी कर्मचाºयांना चांगलेच फैलावर धरले. कामात टाळाटाळ करणाºया कर्मचाºयांचे पगार बंद करण्याची मागणी करण्यात आली. आढावा बैठकीनंतरही कर्मचाºयांच्या कामात सुधारणा न झाल्यास दोडी ग्रामीण रुग्णालयास टाळे लावण्याचा इशारा ब्रह्मानंद फाउण्डेशनचे गणपत केदार यांनी दिला. यावेळी उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य जगनपाटील भाबड, सरपंच लीला सांगळे, महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र दुसाने, एकनात आव्हाड, दोडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयसंह मुंडे यांच्यासह रुग्ण, नातेवाईक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 

Web Title: Changes will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.