कोरोनामुळे आरटीओ कार्यालयाच्या कामात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:28+5:302021-04-17T04:13:28+5:30
राज्यात कोरोना रोखण्यासाठी शासनाने १५ दिवस निर्बंध लागू करत सर्वच शासकीय कार्यालयांना सूचना व निर्देश जारी केले त्यानुसार प्रादेशिक ...
राज्यात कोरोना रोखण्यासाठी शासनाने १५ दिवस निर्बंध लागू करत सर्वच शासकीय कार्यालयांना सूचना व निर्देश जारी केले त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित केले आहे. (नवीन वाहन) अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने, वाहन प्रणालीवर ज्या वाहन फिटनेस मोटर वाहन निरीक्षकांनी ॲप्रूव्ह केले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन नोंदणी काम बंद ठेवण्यात आले आहे. वाहन हस्तांतरण, कर्जबोजा नोंद घेणे, कमी करणे, वाहन प्रणालीवर प्राप्त नियमांची पूर्तता करत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण केेली जातील. नव्याने कामकाजाबाबत अर्ज स्वीकारले जाणार नाही. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण काम केले जाणार नाही. शिकाऊ, पक्क्या लायसन्सचे काम बंद राहील. मात्र रस्ता सुरक्षेशी निगडित वाहन तपासणी करण्यात येईल. वाहन अधिग्रहणाचे काम, सार्वजनिक प्रवासी वाहनातून, खासगी प्रवासी बसमधून होणारी प्रवाशांची वाहतूक शासनाने जारी केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत कोविड नियम पालन केलेल्या सूचनांप्रमाणे होते की नाही याबाबत खात्री केली जाईल, असेही कळसकर यांनी सांगितले.
इन्फो=====
कार्यालयात अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून अन्य कामकाजासाठी येणाऱ्यांना सकाळी १० ते २ पर्यंत अँटिजेन करून ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.