बदलत्या वातावरणाचा द्राक्षांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:42 PM2020-01-28T15:42:05+5:302020-01-28T15:42:14+5:30
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेले नुकसानीचा शिल्लक द्राक्ष बागांना फटका बसत असून माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहे.
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेले नुकसानीचा शिल्लक द्राक्ष बागांना फटका बसत असून माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहे.
धुके, पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी यामुळे फुगवणीवर झालेला परिणाम , बेसुमार फवारण्या , या सर्वांवर मात करून, आज जो काही द्राक्षमाल झाडाला आहे. त्यासाठी व्यापाºयांची कमतरता शेतकºयांना भेडसावत आहे. ज्या शेतकºयांच्या मालाला दर्जा आहे अशा निर्यातक्षम द्राक्षांना बर्यापैकी भाव आहे. द्राक्ष बागांना डाऊनी, भुरी, मण्यांना तडे जाणे हा प्रकार होत असल्याचे उत्पादक सांगत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कसा सुटेल हा प्रश्न गंभीर बनला आहे .त्यात शासनाने मागील अवकाळीचे अनुदान अद्यापही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले नसल्याने अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सध्यातरी दिसत आहे. सध्या द्राक्षाला २५ ते ३० रूपयांच्या आसपास भाव मिळत आहे. परंतु आज सुरू असलेल्या द्राक्षबागा शेतकºयांनी मोठ्या संकटातून वाचवलेल्या आहे. खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असुन त्या प्रमाणात शेतकºयांना भाव मिळत नसल्याने खर्चही भरु न निघत नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे.