बदलत्या वातावरणाचा द्राक्षांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:38 AM2020-01-29T01:38:36+5:302020-01-29T01:39:10+5:30
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.
धुके, पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी यामुळे फुगवणीवर झालेला परिणाम, बेसुमार फवारण्या या सर्वांवर मात करून, आज जो काही द्राक्षमाल झाडाला आहे त्यासाठी व्यापाºयांची कमतरता शेतकºयांना भेडसावत आहे. ज्या शेतकºयांच्या मालाला दर्जा आहे अशा निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी दर आहे. द्राक्षबागांना डावणी, भुरी, मण्यांना तडे जाणे हा प्रकार होत असल्याचे उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कसा सुटेल, असा प्रश्न पडला आहे. त्यात शासनाने मागील अवकाळीचे अनुदान अद्यापही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले नसल्याने अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सध्यातरी दिसत आहे. माझी दोन एकर द्राक्षबाग असून, सध्या एक एकर द्राक्षबाग देण्यासाठी आलेली आहे; परंतु बदलते वातावरण आणि परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन मालाचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्षासाठी मिळणारा दर हा शेतकºयांसाठी परवडत नसून मालही कमी प्रमाणात असल्याने खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकºयांचा त्यातून खर्चही भरून निघत नाही. वर्षभर मेहनत करूनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नसल्याने द्राक्षबागांचे संकट भविष्यात उभे राहिले आहे.
- दीपक दाते,
द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊरद्राक्षांला २५ ते ३० रुपयांपर्यंत भाव1सध्या द्राक्षाला २५ ते ३० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे; परंतु आज सुरू असलेल्या द्राक्षबागा शेतकºयांनी मोठ्या संकटातून वाचविलेल्या आहे. खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असून, त्या प्रमाणात शेतकºयांना दर मिळत नसल्याने खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
2निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, परंतु एक महिना परतीचा चाललेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांना निर्यातक्षम द्राक्षासाठी अडचणी आल्या. मोठ्या प्रमाणात फवारण्या करूनही द्राक्षबागा लोकल व्यापाºयांना द्याव्या लागत आहेत.
3जळगाव नेऊर, मुखेड परिसरात मोजक्याच शेतकºयांकडे द्राक्षबागा असल्याने व्यापारी या भागात येण्यास उत्सुक नसतात, परिणामी वाहतूक भाडे, मजुरी वाढत असल्याने द्राक्षबागा व्यापारी कमी दराने खरेदी करतात, यावर्षी मात्र वातावरणातील बदलामुळे, तसेच दर्जा घसरल्यामुळे व्यापारीवर्गाची वानवा आहे.