मालेगावी घरीच जप-तप-आराधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:26+5:302021-04-25T04:13:26+5:30

शहरात प्रति वर्षी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती उत्सव निमित्ताने वरघोडा मिरवणूक, इतर धार्मिक कार्यक्रम दिवसभर विविध जैन मंदिरात ...

Chanting and worship at home in Malegaon | मालेगावी घरीच जप-तप-आराधना

मालेगावी घरीच जप-तप-आराधना

Next

शहरात प्रति वर्षी मोठ्या उत्साहात भगवान महावीर जयंती उत्सव निमित्ताने वरघोडा मिरवणूक, इतर धार्मिक कार्यक्रम दिवसभर विविध जैन मंदिरात करण्यात येतात. शहरातील मुख्यत: श्र्वेतांबर जैन मूर्ती पूजक संघ,जैन दिगंबर संघ, स्थानकवासी जैन संघ,तेरा पंथी संघासह सकल जैन समाजातील मंदिर, उपाश्रय, स्थानके यातील जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. यामुळे शहरातील धार्मिक वातावरणात ढवळून निघते. परंतु यंदा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. नवीन नियम अटीमुळे इतर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे भगवान श्री महावीर जन्म महोत्सव जैन बांधव घरी साजरी करणार आहेत. याप्रसंगी समाजाचे अनिल लोढा,राजेंद्र ओस्तवाल, ॲड. बालचंद छाजेड, पारस बाफना, सुशील नहार, नवीन मुनोतसह इतर सदस्य उपस्थित होते.

Web Title: Chanting and worship at home in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.