नाशिक परिक्षेत्रात चारित्र्याचे दाखले आता आॅनलाइन

By admin | Published: January 3, 2017 11:48 PM2017-01-03T23:48:37+5:302017-01-03T23:48:56+5:30

विनय चौबे : नागरिकांची सोय, पोलीस स्थापना दिनाचे औचित्य; नाशिक विभागात सुविधा

Character certificates in Nashik range now online | नाशिक परिक्षेत्रात चारित्र्याचे दाखले आता आॅनलाइन

नाशिक परिक्षेत्रात चारित्र्याचे दाखले आता आॅनलाइन

Next

नाशिक : नागरिकांना शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांसाठी शासनाने ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या  आहेत़ त्यामध्ये पोलीस विभागाशी संबंधित वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी या सुविधेचाही
समावेश असून, नाशिक परिक्षेत्रातील नाशिक (ग्रामीण), धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये आॅनलाइन प्रणालीद्वारे काम सुरू झाल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिली आहे़  सामान्य नागरिकांना शासकीय, निमशासकीय नोकरी तसेच खासगी क्षेत्रातही पोलिसांकडील वर्तन व पूर्वचारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे़ या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना वारंवार पोलीस ठाण्यांच्या चकरा माराव्या लागत असल्यामुळे वेळ व पैसा या दोहोंचाही अपव्यय होत होता़ यामुळे पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांसाठी आॅनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या दाखल्यांसाठी नागरिकांना आता पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रकरण घेऊन जाण्याची आवश्यकता नाही़  नागरिकांना वर्तन व पूर्वचारित्र पडताळणी, सुरक्षारक्षक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, पारपत्र (पासपोर्ट), तसेच क्लिअरन्स सर्टिफिकेट अ‍ॅब्रॉड अशा विविध सेवा आपले सरकार या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांनी या सुविधेचा वापर करूनच सादर करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Character certificates in Nashik range now online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.