पॅनलप्रमुखाच्या पुत्राची लागणार वर्णी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:13 AM2021-01-21T04:13:59+5:302021-01-21T04:13:59+5:30
आरक्षणाची तमा न बाळगता १३ सदस्यांपैकी कुठल्याही सदस्याला सरपंचपद बहाल करू, असे पॅनलचे नेते व जिल्हा ...
आरक्षणाची तमा न बाळगता १३ सदस्यांपैकी कुठल्याही सदस्याला सरपंचपद बहाल करू, असे पॅनलचे नेते व जिल्हा व माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर हिरे यांनी सांगितले. गेल्या ३६ वर्षांपासून निमगाव ग्रामपंचायतीवर हिरेंचे वर्चस्व होते, मात्र, गेल्या १० वर्षांपासून हातातून गेलेली सत्ता हिरे यांनी पुन्हा मिळवली आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील आकाश हिरे यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे. आकाश हिरे यांचा राजकारणात प्रवेश झाल्याने निमगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आकाश यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विकास पॅनलने १५ जागांपैकी १३ जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे, तर कर्मवीर भाऊसाहेब हिरे आदर्श पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. पुढील पाच वर्षे संख्याबळाअभावी सत्ता मिळवणे आदर्श पॅनल शक्य नसल्याचे दिसून येत आहे.