लखमापुर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 14:48 IST2021-01-18T14:48:29+5:302021-01-18T14:48:50+5:30
लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे.

लखमापुर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी
लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे. लखमापुर ग्रामपंचायती एकुण १३ सदस्य असुन ५ प्रभागरचना तयार करण्यात आली होती. त्यापैकी तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १० जागांसाठी एकुण २१ उमेदवार निवडणुक रिंगणात आपले नशीब आजमावत होते. त्यात पुरुष मतदार संख्या १६०१ एवढी होती तर महिला मतदार संख्या १४६६ इतकी होती. तर एकुण मतदार ३०६७ एवढे होते. यंदाच्या निवडणूकीत माजी सरपंच ज्योती विजयराव देशमुख व माजी सरपंच मंगला रावसाहेब सोनवणे या दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने ,तसेच माजी उपसरपंच बाळासाहेब शिवाजी देशमुख यांनी बाजी मारल्याने आता लखमापुर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.
--------------
विजयी उमेदवार व प्रभाग पुढील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक :- १ सोमनाथ बदादे :- ( विजयी ), सुमनताई रेहरे (बिनविरोध). प्रभाग क्रमांक:- २, भिकन राजदेव :- ( विजयी ), स्वाती दळवी ( बिनविरोध), प्रभाग क्रंमाक:-२ राजेंद्र देशमुख : (विजयी), प्रभाग क्रंमाक:-३ भाऊसाहेब मेसट : (विजयी), ज्योती मोगल : (विजयी), जया मोगल ( बिनविरोध) प्रभाग :-४ किशोर सोनवणे: (विजयी), प्रभाग :-४ पुष्पा सोनवणे:- (विजयी), प्रभाग :- ४ संगीता देशमुख:-( विजयी). प्रभाग क्रमांक :- ५
बाळासाहेब शिवाजी देशमुख:- (विजयी), प्रभाग क्रमांक:-५ शालिनी सोनवणे:- (विजयी)
-------------------
दोन माजी सरपंच ज्योती देशमुख, मंगला सोनवणे व माजी सरपंच सुभद्रा देशमुख यांचे चिरंजीव मेघराज देशमुख यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. आता सरपंच कोण? याकडे सर्व लखमापुर जनतेचे लक्ष लागले आहेत.