आयमा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:01 AM2018-05-28T00:01:26+5:302018-05-28T00:01:26+5:30

उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी सांगिंतले, तर आयमा ही कोणा एकट्याची संघटना नसल्याने अध्यक्षपदाचा शब्द देण्याचा विषय नसल्याचे सत्ताधारी एकाता पॅनलचे उमेदवारवरून तलवार यांनी सांगितले.

 Charges and reactions in the AIMA elections | आयमा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

आयमा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

googlenewsNext

सिडको : उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी सांगिंतले, तर आयमा ही कोणा एकट्याची संघटना नसल्याने अध्यक्षपदाचा शब्द देण्याचा विषय नसल्याचे सत्ताधारी एकाता पॅनलचे उमेदवारवरून तलवार यांनी सांगितले.  आयमाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची परंपरा यंदा खंडित झाली असून, येत्या २९ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असताना सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाचे सत्ताधारी पॅनलकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.  एकता पॅनलच्या विरोधी गटाचे प्रतिनिधित्व करणाºया संजय महाजन यांनी २०१४-२0१६ मध्ये झोलल्या निवडणुकीत पुढील निवडणुकीत तुषार चव्हाण यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला होता. मात्र आता विश्वासात न घेता समोरील गटाने वरूण तलवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले असे सांगतानाच आयमा हाउस हे त्यावेळी तत्कालीन अध्यक्षांनी दीर्घ मुदतीवर व अल्पमोबदल्यात कराराने दिले होते, परंतु यास आक्षेप घेतल्याने आज आयमा हाउस आयमाच्या ताब्यात आहे, असा आरोपही महाजन यांनी केला. त्याचे खंडन करताना सत्ताधारी एकता पॅनलचे मुख्य प्रवर्तक धनंजय बेळे यांनी आयमा ही कोणा एकट्याची नसून उद्योजकांची संघटना आहे. त्यामुळे तुषार चव्हाण यांनी आपल्याला पुढील अध्यक्ष बनविण्यासाठी लेखी देण्याचा प्रश्नच नाही. तसेच संघटेनेत राहून संघटेनच्या विरोधात चॅरिटी कमिशनरकडे तक्रारी करावयाच्या ही बाब संघटेच्या दुष्टीने चुकीची असून, आजही तुषार चव्हाण व संजय महाजन यांनी संघटेच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्योजकांचे नेतृत्व करणाºया अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व विरोधी गटाच्या एकता पॅनल या दोघांकडून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याच चित्र बघावयास मिळात आहे.

Web Title:  Charges and reactions in the AIMA elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.