नऊ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:33 PM2020-04-28T20:33:42+5:302020-04-28T23:03:36+5:30
लासलगाव : कोरोना लॉकडाउन असतानाही लासलगाव येथे विनाकारण मास्कशिवाय फिरणाऱ्या इसमांविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. नेमून दिलेल्या जागेत भाजीपाला विक्री न करणारे विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.

मंगळवारी मास्क न घालता फिरणाºया इसमावर एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक दुचाकी जप्त केली आहे. दुचाकीवर फिरणारे २३ वाहनांवर कारवाई करून ४६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणी न बसणारे भाजीपाला विकणाºयावर ग्रामपंचायतने पावती फाडून दंडात्मक कारवाई केलीे. सोमवारी सायंकाळी लासलगाव ग्रामपंचायत येथे कोरोनाच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी किराणा दुकाने ही सकाळी १० ते ४ यावेळेतच चालू ठेवावी अन्यथा सदर दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल व तोंडाला मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, असे ठरविण्यात आले. तसेच सदर बैठकीत गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावात पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यान मुंबई कृउबा समिती संचालक जयदत्त होळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.