अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:43+5:302021-07-31T04:14:43+5:30

दिनांक २९ जुलै रोजी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी टाकळी विंचूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये बालविवाहास कायद्यानुसार ...

Charges filed against six persons in connection with the marriage of a minor girl | अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

दिनांक २९ जुलै रोजी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी टाकळी विंचूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये बालविवाहास कायद्यानुसार प्रतिबंधक कायदा असताना अल्पवयीन मुलीचा विवाह घडवून आणला. टाकळीचे ग्रामविकास अधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी शशिकांत माधव कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यात पुरोहित भंडारी गुरूंसह, विजय भास्कर मौले, शोभा विजय मौले, वर विशाल प्रकाश जाधव , श्रीमती भारती प्रकाश जाधव, सर्व रा. , लासलगाव व संदीप दत्तू कदम, रा. टाकळी विंचूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ठोंबरे व तपासी अंमलदार पो. ना. एस. शिंदे तपास करीत आहेत.

Web Title: Charges filed against six persons in connection with the marriage of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.