सटाण्यात देवमामलेदारांचा रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:46 AM2021-12-31T01:46:46+5:302021-12-31T01:47:08+5:30
बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवार (दि. ३०) पासून सुरुवात झाली. दरम्यान, महापूजेनंतर दुपारी शहरातून महाराजांची सवाद्य रथयात्रा काढण्यात आली.
नाशिक : बागलाणचे आराध्य दैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास गुरुवार (दि. ३०) पासून सुरुवात झाली. दरम्यान, महापूजेनंतर दुपारी शहरातून महाराजांची सवाद्य रथयात्रा काढण्यात आली.
पहाटे चार वाजता बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्याहस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. महापूजेनंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजेनंतर काढण्यात आलेली महाराजांची सवाद्य मिरवणूक हे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी भजनी मंडळाच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले होते. मिरवणूक मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटून फुलांनी रस्ते सजवले होते. चौका-चौकात सुवासिनींनी रथातील महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले व रथावर पुष्पवृष्टीही केली.
इन्फो
महाराजांच्या खुर्चीची पूजा
बागलाण तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा सकाळी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. तसेच रथाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने भिका मिस्तरी यांच्या परिवाराचा देवस्थानच्यावतीने सन्मान करण्यात आला.
फोटो मेलने पाठवले आहेत.