शालार्थ आय. डी. चे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 02:17 PM2019-03-11T14:17:31+5:302019-03-11T14:17:39+5:30
सिन्नर : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयात मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
सिन्नर : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयात मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शालार्थ आयडीचे संपूर्ण अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता विभागातील प्रलंबित शालार्थ आयडीची कामे नाशिक येथे होतील, अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. गेल्या अनेक महिन्यापासून शालार्थ आयडीचा प्रश्न सुटता सुटत नसल्याने नाशिक विभागातील ३७५ फाईल या शिक्षण आयुक्त कार्यालयात पडून आहे व ४०० च्या जवळ पास फाईल या शिक्षण उपसंचालक कार्यालयात पडून आहे. या बाबत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला. मात्र त्याला संबंधीत कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी (दि.६) रोजी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयात ठिय्या मांडला. या ठिय्या आंदोलनाला शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी प्रत्येक्षात येऊन पाठिबा दिला, तसेच दुरध्वनीद्वारे आयुक्त, संचालक यांच्याशी चर्चा केली. मुख्याध्यापक संघाच्या मागणीनुसार पत्र २ च्या सुनावण्या त्वरित घ्या, नाशिक उपसंचालक कार्यालयात पडून असणाऱ्या फाईल त्वरित पुणे येथे मागवा, शालार्थ आय. डी. चे संपूर्ण अधिकार शिक्षण उपसंचालकांना द्याव्येत याबाबत चर्चा केली. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी २८ फेब्रुवारी पर्यंतच्या सर्व फाईल पुणे येथे पुर्ण केल्या जातील, तसेच त्यासाठी कृतीदलाची आवश्यकता नसल्याने कृतीदल बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सध्या नाशिक विभागात निर्णय घेण्यात आलेल्या ७८७ प्रस्ताव ३१२ त्रुटित असलेले प्रस्ताव, २६२ प्रलंबित प्रस्ताव अशी स्थिती आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शालार्थ आय. डी. चा संघर्ष उभा केला होता. दीड वर्षापासून शालार्थ आय.डी.साठी लढणाºया संघटनेला मोठे यश आले. यात आमदार डॉ.सुधीर तांबे, संजय देसले, बी. डी. गांगुर्डे, एस. के. सावंत, संगिता बाफना, प्रकाश पानपाटील, टी. एस. ढोली, शरद गिते, सुरेश बडगुजर, अविनाश कांगणे, संजय सराफ, राजाराम बोरस्ते, प्रशांत सोनवणे, ए. बी. काटे, डी. एस. ठाकरे यांचा सहभाग होता.