लेजीम पथकाचे आकर्षण अन् शिवप्रेमींमध्ये जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:01 PM2020-02-19T23:01:10+5:302020-02-20T00:12:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येवला शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. लेजीम पथक आकर्षण ठरले. जळगाव नेउर येथून युवकांनी दुचाकीवर रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला. अनेक शाळा व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले.
येवला : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येवला शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. लेजीम पथक आकर्षण ठरले. जळगाव नेउर येथून युवकांनी दुचाकीवर रॅली काढून शिवरायांचा जयजयकार केला. अनेक शाळा व सामाजिक संस्थांनी विविध उपक्रम राबविले.
स्वातंत्र्य काळापासूनची ऐतिहासिक परंपरा जोपासत, ८० वर्षांपासून क्र ांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने सुरू असलेली येवल्यातील पाटोळे गल्लीतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शिवजयंती उत्सव मिरवणुकीत आयोजक सुभाष पहिलवान पाटोळे, सिंधूताई पाटोळे, युवराज पाटोळे, वैष्णवी पाटोळे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. मिरवणुकीत आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, उद्योजक प्रताप पाटोळे, कृषितज्ज्ञ केशव पाटोळे, इतिहास अभ्यासक यादव, अॅड. माणिकराव शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, सहकार नेते अंबादास बनकर, बाळासाहेब लोखंडे, विजय श्रीश्रीमाळ, तहसीलदार रोहिदास वारु ळे, नगरसेवक प्रवीण बनकर, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जनश्रद्धा ग्रुपचे कुमार गुजराथी, मयूर गुजराथी, धडपड मंचचे प्रभाकर झळके, महाजन ग्रुप, दिनेश परदेशी ग्रुप आदींनी मांडलेल्या शिवप्रतिमांचे पूजन आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, सुभाष पाटोळे, युवराज पाटोळे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिवराम वडे, मराठा सेवा संघाचे संजय पवार, भीमराज सरगडे यांनी केले.
मिरवणुकीत मधुकर सांबरे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, काशीनाथ पहिलवान शिंदे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक गणेश शिंदे, प्रवीण बनकर, डॉ. संकेत शिंदे, आनंद शिंदे, समीर देशमुख, माधव पवार, अविनाश कुक्कर, संजय सोमासे, बालू परदेशी, बाळू पहिलवान शिंदे, चंद्रकांत कासार, प्रशांत पाटील, धीरज परदेशी, सलीम काझी, एजाज शेख आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांनी भगवे कुर्ते परिधान करत मोटारसायकल फेरी काढत शिवरायांचा जयजयकार केला. तर मुलींनी भगवे फेटे घालत उत्सवात सहभाग घेतला.