...अन् वृद्धांनी साकारल्या आकर्षक गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:36 AM2018-09-05T01:36:05+5:302018-09-05T01:38:17+5:30
नाशिक : वृद्धाश्रम म्हटले की आजही मन उदास होते. जन्मदात्यांना सांभाळायलाही मुलांना वेळ नाही का? असा प्रश्न पडतो. पण विविध कारणांमुळे वृद्धाश्रमात रहावे लागणारे वृद्ध आपले दैनंदिन जीवन आनंदात, मजेत आणि कृतिशील निर्मितीत व्यतीत करत असतील तर त्याहून आनंदाची गोष्टच असू शकत नाही.
नाशिक : वृद्धाश्रम म्हटले की आजही मन उदास होते. जन्मदात्यांना सांभाळायलाही मुलांना वेळ नाही का? असा प्रश्न पडतो. पण विविध कारणांमुळे वृद्धाश्रमात रहावे लागणारे वृद्ध आपले दैनंदिन जीवन आनंदात, मजेत आणि कृतिशील निर्मितीत व्यतीत करत असतील तर त्याहून आनंदाची गोष्टच असू शकत नाही. असाच काहीसा विचार करून जवळ येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपल्या हातांनी आकर्षक गणेशमूर्ती साकार करून सर्वांना आश्चर्याचा धक्का देण्याचे काम केले आहे येथील वात्सल्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी. विविध वयोगटातील या ज्येष्ठ नागरिकांनी स्नेहा शिंदे, श्रद्धा शिंदे, सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविले आहेत. आश्रमातील २० आजी-आजोबांनी आपल्या हाताने, आपल्या कल्पनाशक्तीला संपूर्ण वाव देत आकर्षक गणराय साकारले आहेत. लहान-मोठ्या आकाराचे, निरनिराळ्या नक्षीचे गणराय त्यांनी साकारले आहेत. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सतीश सोनार, सचिव जय बडगुजर, स्वामी निस्पृहस्पंदन महाराज, कर्मचारी यांनी यासाठी आजी-आजोबांना प्रोत्साहन देत त्यांच्यातल्या कलेला दाद दिली.