चिचोंडीत मशाल मिरवणूक
By Admin | Published: February 22, 2017 11:51 PM2017-02-22T23:51:07+5:302017-02-22T23:51:31+5:30
येवला : शिवयोद्धा सेवाभावी मंडळाचा उपक्र म
येवला: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथील शिवयोद्धा सेवाभावी मंडळाने रायगडहून पायी आणलेल्या मशालीची व शिवाजी महाराज पुतळ्याची गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी रायगडहून पायी मशाल आणून येथील शिवप्रेमी युवक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. हे युवक छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत चिचोंडी बुद्रुक गावात पोहोचले. गावात ठिकठिकाणी महिलांनी मशालीचे पूजन केले. येथील मंदिरापुढे गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या युवकांनी रायगडावर स्वच्छता अभियान राबवून ऐतिहासिक वस्तू व किल्ल्याप्रती संवर्धन खूप महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला. सात दिवस पायी प्रवास करून हे युवक सलग तिसऱ्या वर्षी मशाल गावात घेऊन आल्याने मोठा उत्साह गावात दिसून आला. यावर्षी शिवचरित्रावर गोरख महाराज कुदळ यांचे व्याख्यान व महाप्रसाद आयोजित केला. मशाल यात्रेत ग्रुपचे सदस्य रावसाहेब मढवई, गोडीराम मढवई, गणेश गोसावी, अनिल मढवई, पुंडलिक शिंदे, समाधान सूर्यवंशी, रवींद्र मढवई, कृष्णा डांगे, संतोष मढवई, संतोष भोरकडे, भाऊसाहेब मढवई, शुभम मढवई, अंतू कुटे, रंभाजी कुटे, औदुंबर मढवई, शरद पवार, दादा लभडे, विक्र म रोठे आदिंसह युवक या मशाल यात्रेत सहभागी झाले होते. तर मनोज गायकवाड, सुनील खराटे, गोरख पगारे आदिंसह सर्व जातिधर्माचे युवक या उत्सवात सहभागी झाले होते. मशाल गावात पोहोचताच सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नामदेव मढवाई, प्रभाकर सूर्यवंशी, सोमोदय मढवई, सुखदेव मढवाई, रघुनाना घोटेकर, नंदू घोटेकर आदिंसह ग्रामस्थांनी स्वागत केले. रात्री कीर्तनास गर्दी झाली. महाप्रसादाने सांगता झाली.