सटाणा : कांद्याचे शेड जमीनदोस्त

By admin | Published: May 13, 2015 11:43 PM2015-05-13T23:43:27+5:302015-05-14T00:17:04+5:30

जिल्ह्याला मान्सूनपूर्व तडाखा

Chatana: Onion shredder | सटाणा : कांद्याचे शेड जमीनदोस्त

सटाणा : कांद्याचे शेड जमीनदोस्त

Next

नाशिक : जिल्ह्यातील निफाड, येवला, लासलगाव, सटाणा, सुरगाणा, सिन्नर , चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आदि ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसाने शेतकऱ्यासह नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
लासलगावी मान्सुनपुर्व पाऊस
लासलगाव : येथे बुधवारी सायंकाळी अचानक झालेल्या मान्सूनपुर्व पावसाने लासलगाव जलमय झाले. या पावसाने निर्माण झालेल्या काहीशा थडीने लासलगावकर सुखावले . पावसाने लासलगावचे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.
पावसाने नागरिकांची धावपळ
निफाड : येथे बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या मान्सूनपुर्व पावसाने निफाड तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील जळगाव, काथरगाव, कोठुरे, शिवरे, उगाव , खेडे, कोळवाडी, नैताळे, खेडलेझुंगे,धारणगाव या ठिकाणी पाऊस झाला.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सांयकाळी पावसाचे आगमण झाले. गावत सिंहस्थ कुंभमेळ्याअंर्तगत विकास कामे सुरू असून पावसामुळे या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पिंपळगाव बसवंत : येथे सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे कांदा लिलाव करण्यास अडचण निर्माण झाली होती.
सिन्नर : तालुक्यातील विविध ठिंकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे हवामान काहीसे थंड झाले आहे.
आठवडे बाजारावर परिणाम
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथेही बुधवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामूळे आठवडे बाजारात शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे चांगलेच हाल झाले.
येवला : शहर व सायगाव परिसतात बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मान्सुनपुर्व पावसाने अर्धा तास विजेच्या कडकडाटासह वादळी हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली.
या पावसाने सायगावसह पूर्वभागात व परिसरातील अनेक शेतात पाणी साठले. घरांची पत्रे उडाली. सुनील देशमुख यांच्या २ जर्सी गायी वादळाच्या तडाख्याने उडालेल्या पत्र्यामुळे जखमी झाल्या. पावसाने शहर व पूर्व भागाला झोडपून काढले. गेल्या ३ दिवसापासून ऊन कमालीचे होते. तपमान ४२ अंशावर पोहोचले होते. त्यातच दुपारी तीन वाजता सर्वत्र जोरदार वारे सुटले, धुळीचे लोट हवेत दिसू लागले. अर्धा तासाच्या वादळी वाऱ्यानंतर अर्धा तास शहरात मुसळधार पाऊस झाला. साडेतीन वाजता वाऱ्याचा व पावसाचा वेग मंदावला. मात्र तत्पुर्वी जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणचे फलक फाटल्याने त्याचे तुकडे झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले तर शहर व तालुक्यातील विविध भागातील सुमारे १० ते १२ झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा व वायर तुटून रस्त्यावर पडल्या. काही भागातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता. रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या अनेक फांद्यांनी रस्ते बंद केले होते. शहरात बस स्थानक आवारातील झाड गाडीवर पडले. आगामी दिवसात उष्णता आणखी भडकेल असा तज्ञांचा अंदाज आहे. लहान मुलांनी मात्र या पावसात भिजणे पसंत केले.
सटाण्यात कांद्याचे
शेड जमीनदोस्त
सटाणा शहर व तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह दोन तास मुसळधार पावसाने झोडपले. वादळी पावसामुळे बाजार समीती आवारातील सहा कांद्याचे शेड जमीनदोस्त होऊन शेकडो टन कांदा भिजला. त्यामुळे सुमारे साठ लाख
रूपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सटाणा, ब्राम्हणगाव रस्त्यावरील झाडे कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प होती. मुख्य वीज वाहिन्या तुटल्याने शहराचा वीज पुरवठा चार तास खंडित होता. शहरासह शेमळी, आराई, ब्राम्हणगाव, लखमापूर, चौगाव, भाक्षी, मुळाने, कौतीकपडे, औंदाणे, मोसम खोऱ्याला विजांच्या कडकडाटासह दोन तास वादळी पावसाने झोडपले. वादळी पावसामुळे सटाणा बाजार समीती आवारातील रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, एस. ताराचंद, अशोक निकम यांचे सहा कांद्यांचे शेड जमीनदोस्त झाले. या नुकसानीमुळे कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दिंडोरीत जोरदार वादळ
दिंडोरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सायंकाळी वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवारी दिवसभर प्रचंड उष्म्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने भाजीबाजारातील अनेक प्लास्टिकचे पाल उडून नुकसान झाले. खेडगाव, कादवा कारखाना, मोहाडी जानोरी परिसरात पाऊस झाल्याचे वृत्त
आहे.(लोमकत चमू)

Web Title: Chatana: Onion shredder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.