उलगडले नाशिकचे चौफेर सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:26 PM2017-08-20T22:26:02+5:302017-08-21T00:23:49+5:30

‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते, तसेच हजार शब्दांमध्ये जे मांडता येत नाही ते एक छायाचित्र सांगून जाते, याचा प्रत्यय रविवारी शहरात आला. नाशिक शहरासह जिल्ह्याची भ्रमंती करत विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी टिपलेले नाशिकचे चौफेर सौंदर्याचे पैलू नाशिककरांसमोर एकापेक्षा एक सरस छायाचित्रांमधून उलगडले.

 Chaucer Beauty of Nalin | उलगडले नाशिकचे चौफेर सौंदर्य

उलगडले नाशिकचे चौफेर सौंदर्य

googlenewsNext

नाशिक : ‘प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते, तसेच हजार शब्दांमध्ये जे मांडता येत नाही ते एक छायाचित्र सांगून जाते, याचा प्रत्यय रविवारी शहरात आला. नाशिक शहरासह जिल्ह्याची भ्रमंती करत विविध वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी टिपलेले नाशिकचे चौफेर सौंदर्याचे पैलू नाशिककरांसमोर एकापेक्षा एक सरस छायाचित्रांमधून उलगडले. निमित्त होते, नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त बी. डी. भालेकर मैदानावरील संस्थेच्या कार्यालयात तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ रविवारी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, पोपटराव भानसी, अध्यक्ष नीलेश तांबे आदि उपस्थित होते. दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये नाशिकचे पावसाळ्यातील खळाळणारे धबधबे, उन्हाळ्यात ग्रामीण भागातील दुष्काळ अन् पाणीटंचाई, कुंभमेळ्याच्या छटा, फुलांसह प्राणी-पक्ष्यांची जैवविविधता, विविध सण-उत्सव, आदिवासी बांधवांची संस्कृती, जुन्या वाड्यांची स्थापत्यकला, त्र्यंबकेश्वरची वारी, ब्रह्मगिरीची फेरी अशा विविध विषयांना स्पर्श करणारे बोलक्या छायाचित्रांचा समावेश आहे. यावेळी भानसी म्हणाल्या, प्रेस छायाचित्रकारांची एखाद्या विषयाकडे बघण्याची दृष्टी आणि त्याआधारे क्लिक करून समाजप्रबोधनाचा केलेला अप्रत्यक्ष प्रयत्न या प्रदर्शनातून जाणवतो. म्हणूनच हे छायाचित्र प्रदर्शन हे अन्य प्रदर्शनापेक्षा ‘जरा हटके’ ठरते. नाशिककरांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देऊन आपलं नाशिक अन् त्याचे सौंदर्य अनुभवावं, असे आवाहन त्यांनी केले.



 

Web Title:  Chaucer Beauty of Nalin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.