चौधरीचा अटकपूर्व जामीन नामंजूर

By admin | Published: October 30, 2015 11:29 PM2015-10-30T23:29:47+5:302015-10-30T23:30:32+5:30

निलंबित पोलीस निरीक्षक सादरे आत्महत्त्या : अटकेचा मार्ग मोकळा

Chaudhary's anticipatory bail will be rejected | चौधरीचा अटकपूर्व जामीन नामंजूर

चौधरीचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Next

नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित सागर चौधरीचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ कदम यांनी शुक्रवारी (दि़ ३०) नामंजूर केल्याने त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरीने २० आॅक्टोबरला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता़ त्यावर २६ आॅक्टोबरला सरकारी वकील व चौधरीच्या वकिलांनी आपले लेखी म्हणणे व युक्तिवाद सादर केले असता, न्यायालयाने ३० आॅक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता़ शुक्रवारी पुन्हा न्यायालयात दोन्ही बाजुंनी युक्तीवाद केला. चौधरीचे वकील अ‍ॅड़ बिपीन पांडे यांनी चौधरीवरील गुन्हे हे महसूल विभागाचे असून तो वाळूमाफिया नसल्याचा अर्ज दिला़ त्यावर जिल्हा सरकारी वकील घुमरे यांनी चौधरीवर जळगाव महसूल विभागाने दाखल केलेले ५ गुन्हे व दंडाच्या पावत्या सादर करून तो वाळू व्यावसायिक व माफिया असल्याचे पुरावे सादर केले़ तसेच जळगावमध्ये बदली झाल्यानंतर वरिष्ठांना हाताशी धरून सादरेंवर गुन्हे दाखल झाल्याचे सांगून, चौधरीच्या अटकेशिवाय वरिष्ठांचा सहभाग व या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नसल्याने अटकपूर्व नामंजूर करण्याची विनंती केली़ यानंतर दुपारी न्यायाधीश कदम यांनी चौधरीचा अटकपूर्व जामीन अर्ज नांमजूर केला़ या गुन्ह्णाचा तपास पोलिसांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला असून शनिवारी (दि़ ३१) त्यांच्याकडे तपासाची कागदपत्रे सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे़ (पान ५ वर)

दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या या निकालाची प्रत मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे चौधरीचे वकील शिंपी यांनी सांगितले आहे़
जळगावमधील रामानंदनगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ आॅक्टोबरला आत्महत्त्या केली़ आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले होते़ त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात माधुरी सादरे यांच्या फिर्यादीवरून जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ़जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांच्यावर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Chaudhary's anticipatory bail will be rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.