सेना वाटेवरील चव्हाण दाम्पत्य फिरले माघारी

By श्याम बागुल | Published: September 16, 2019 08:03 PM2019-09-16T20:03:20+5:302019-09-16T20:05:14+5:30

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे भाजपात, तर दीपिका चव्हाण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार यांनी दिवसभरात पंधराही

Chavan couple marched back on army road | सेना वाटेवरील चव्हाण दाम्पत्य फिरले माघारी

सेना वाटेवरील चव्हाण दाम्पत्य फिरले माघारी

Next
ठळक मुद्देशरद पवारांकडून आढावा : राष्टÑवादीच्या इच्छुकांची चाचपणीयेवल्यातून भुजबळ यांच्या ऐवजी अन्य एका इच्छुकांनी इच्छा प्रदर्शित केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राज्यस्तरीय दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून केली. पंधरा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व निवडणूक इच्छुकांकडून राजकीय समीकरणे व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना सर्वांना एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण व त्यांचे पती संजय चव्हाण हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याबाबत होत असलेल्या चर्चेचे तथ्य काय अशी विचारणा शरद पवार यांनीच केल्याने चव्हाण दाम्पत्यांनी आपण राष्टÑवादीतच असल्याचा खुलासा केला.


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे भाजपात, तर दीपिका चव्हाण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार यांनी दिवसभरात पंधराही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बागलाण मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना पवार यांनी राजकीय परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी काही पदाधिका-यांनी राष्टÑवादीच्या आमदार दीपिका चव्हाण या सेनेच्या वाटेवर असल्याची मतदारसंघात चर्चा होत असून, तसे वृत्त प्रसिद्धही झाले आहे. त्यामुळे तसे होणार असेल तर त्यांनी अगोदर स्पष्ट करावे, अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी चव्हाण दाम्पत्याला विचारणा करून काय असेल ते स्पष्ट करा, अन्यथा मतदारसंघात अन्य इच्छुक तयार असल्याचे सांगितले. त्यावर दीपिका चव्हाण यांनी सर्व चर्चा निरर्थक असल्याचे सांगून आपण राष्टÑवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. दिंडोरीचे नरहरी झिरवाळ यांनीही दिंडोरी मतदारसंघाच्या आढावा बैठकीला हजेरी लावली. त्यांच्याबाबतही होणा-या चर्चेला पूर्ण विराम देण्यात आला. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांचा आढावा घेताना नांदगावमधून एकमेव, तर येवल्यातून भुजबळ यांच्या ऐवजी अन्य एका इच्छुकांनी इच्छा प्रदर्शित केली.
तब्बल दहा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या आढावा बैठकीत शरद पवार यांनी मतदारसंघातून निवडून येण्यासाठी युवक, महिला आघाडीची तयारी काय? निवडणुकीला सामोरे जाण्यास कोण कोण तयार आहे, उमेदवारी न मिळाल्यास काय भूमिका राहील याची विचारणा केली. त्याचबरोबर पक्षात चांगले-वाईट दिवस येत असतात त्यामुळे मनोधैर्य खच्चीकरण होऊ देऊनका. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात संताप असून, त्याचा फायदा उचला, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, मंदी, शेतमालाला भाव आदी विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.
चौकट====

Web Title: Chavan couple marched back on army road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.