वावी येथे चारा-छावणीसाठी चाबुक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:20 PM2019-03-06T13:20:56+5:302019-03-06T13:21:13+5:30

वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबुक आंदोलन करण्यात आले.

Chawk movement for fodder camp at Wavi | वावी येथे चारा-छावणीसाठी चाबुक आंदोलन

वावी येथे चारा-छावणीसाठी चाबुक आंदोलन

googlenewsNext

वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबुक आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा-पाणी व्यवस्था करण्यात यावी, दुष्काळी सवलतींचा लाभ देण्यात यावा, कर्ज वसुली त्वरीत थांबवून संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी महाराष्टÑ क्रांती सेनेने शासनाला वेळावेळी निवेदने दिली आहेत. मात्र त्याचा उपयोग न झाल्याने पूर्व भागातील वावी येथे चाबुक आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. चारा छावण्यासाठी निवेदने, ठिय्या आंदोलन, उपोषणे करण्यात आली. चारा-पाणी मिळत नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे. बळीराजाने जनावरांना बाजाराची वाट दाखविण्यास प्रारंभ केला आहे. शेतकरी आत्महत्त्या होत आहेत. शेतकऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नाही. शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी यावेळी सांगितले. सिन्नर तालुक्यावर वारंवार दुष्काळ पडत आह. तालुक्यातील शेतकºयांवर दुष्काळ नावाचे भूत मानगुटीवर बसले आहे. दुष्काळाचे भूत हटवावे यासाठी दुष्काळी भुताला चापकाचे फटके मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव, तालुकाध्यक्ष गोपाळ गायकर, ज्ञानेश्वर पांगारकर, सुनील काटे, अक्षय जाधव, चंद्रकांत डावरे, सोपान जाधव, गणेश जाधव, सतिष आरोटे, योगेश गुरुळे, भाऊसाहेब सहाणे, बाळासाहेब सहाणे, कैलास दातीर, अर्जून घोरपडे, अकुंश आव्हाड, शुभम मुरकुटे, जगन्नाथ गरकळ, तुषार काळे, नागेश कोथमिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Chawk movement for fodder camp at Wavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक