प्रभारी सभापतींकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:46 AM2018-07-11T00:46:15+5:302018-07-11T00:46:21+5:30
सिन्नर : पंचायत समितीचे प्रभारी सभापती जगन्नाथ भाबड यांनी पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांना भेटी दिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सर्व अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयातच थांबणे बंधनकारक असताना दोन अधिकाºयांनी रजेचा अर्ज न देताच दांडी मारल्याचे आढळून आले. या अधिकाºयांच्या सह्यांच्या मस्टरवर गैरहजेरीचा शेरा मारण्यात आला. दांडीबहाद्दरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा भाबड यांनी दिला.

कामकाजाचा पहिला दिवस असल्याने एकात्मिक बालविकास विभागाच्या एखादा अपवादवगळता अन्य कर्मचारी जागेवरच आढळून आले, तर जे अधिकारी - कर्मचारी जागेवर नव्हते, ते ग्रामीण भागात गेल्याचे पाहणीत आढळून आले.
पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांनी राजीनामा दिल्याने उपसभापती भाबड यांच्यावर प्रभारी सभापतिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सभापतिपदी निवड होईपर्यंत विद्यमान उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी सभापती म्हणूून काम पहावे, असे पत्र जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना दिले. त्यानुसार भाबड यांनी सभापतिपदाचा पदभार स्वीकारला. अनुपस्थित कर्मचाºयांवर कारवाईपदभार स्वीकारताच भाबड यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना सोबत घेत पंचायत समितीतील सर्व विभागात जाऊन येथील अधिकारी, कर्मचाºयांच्या उपस्थितीबाबत चौकशी केली. कर्मचाºयांनी विनाकारण गैरहजर किंवा कार्यालयात अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.