सिन्नरच्या वडझिरेच्या सरपंच छाया नागरे यांनी केले ‘ग्राम रक्षण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:21 PM2019-02-28T19:21:38+5:302019-02-28T19:23:53+5:30
सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावकºयांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त्यांनी बंदी आणली ती आजतागायत.
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात सरपंच शरद नागरे यांनी ग्राम सुरक्षेवरभर देत गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘ग्राम रक्षण’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील वडझिरे या गावी त्यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गावकऱ्यांना एकत्र आणत तंटामुक्त ग्राम समिती स्थापन केली. गावात या समितीच्या माध्यमातून गावक-यांचा विश्वास जिंकत मागील दहा वर्षांपासून गावात नवरदेवाची मिरवणूक व वरात, डीजे, बॅँजोवर त्यांनी बंदी आणली ती आजतागायत. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी गावात ‘एक झाड लेकी’चे हा उपक्रम राबविला. ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. मागील काही वर्षांपासून गावात चोरीपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद नाही. गावाची एकात्मता जोपासण्यासाठी विविध उपक्रमांतर्गत प्रयत्न. लोकसंख्येच्या तुलनेत फौजदारी गुन्हे २ टक्क्यांपेक्षश कमी. दारू, जुगारबंदीचा निर्णय घेत यशस्वीपणे अंमलबजावणी केली. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने त्यांना ‘ग्राम रक्षक’ गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.