स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा १ मे पासून संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:18+5:302021-04-29T04:11:18+5:30
या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयात पाठवूनही शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीचा विचार न केल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ...
या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयात पाठवूनही शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीचा विचार न केल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने राज्यव्यापी संप १ मे पासून पुकारला आहे. जोपर्यंत शासन स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करीत नाही, तोपर्यंत धान्य वितरणासाठी पाठवू नये व भरणा करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना अध्यक्ष दादाभाऊ अहिरे, सचिव प्रकाश जैन, शिवाजी ठाकरे, रघुनाथ वाघ, गणोश वाघ, दत्तात्रय साळुंके शिवाजी पाटील, चंद्रशेखर कासलीवाल, रामभाऊ वासुळकर आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------------
चांदवडला दिवसभरात कोरोनाचे १७ नवीन रुग्ण
चांदवड - चांदवड येथे २५ एप्रिल रोजी ५७ व्यक्तींपैकी १७ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांतील आहेत. तालुक्यातील देणोवाडी, हरसूल, हिवरखेडे, पाथरशेंबे, शिरसाणो असे एकूण १७ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
----------------------------------------------------------------------------
चांदवडला अनोळखी महिलेचा दवाखान्यात मृत्यू
चांदवड - चांदवड येथील गणूर चौफुली, फॉरेस्ट ऑफिससमोर एका ५५ ते ६० वर्षीय अनोळखी महिलेस न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णवाहिकेतून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दळवी यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.