क्रेडिट कार्डची माहिती विचारून फसवणूक

By admin | Published: January 12, 2015 12:42 AM2015-01-12T00:42:32+5:302015-01-12T00:42:43+5:30

क्रेडिट कार्डची माहिती विचारून फसवणूक

Cheating by asking for credit card information | क्रेडिट कार्डची माहिती विचारून फसवणूक

क्रेडिट कार्डची माहिती विचारून फसवणूक

Next

नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून के्रडिट कार्डची माहिती विचारून त्याद्वारे खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
७ जानेवारीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास ९२१०१७८४५३ या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादीस फोन आला़ संबंधित व्यक्तीने आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून के्रडीट कार्ड अपडेट करण्यासाठी माहिती विचारून घेतली़ यानंतर या माहितीचा वापर करून हॉट डील बाजारमधून ८ हजार ५०४ रुपयांची खरेदी केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूरच्या कंपनीत चोरी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील रिलायन्स इंजिनिअरिंग कंपनीतून चोरट्यांनी तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे़
चोरट्यांनी कंपनीची खिडकीद्वारे कंपनीत प्रवेश करून सात कॉपरच्या पट्ट्या व कॉपर वायर असा एकूण ४५ किलो वजनाचा माल चोरून नेला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
निरीक्षणगृहातील दोन मुले बेपत्ता
उंटवाडी येथील बाल निरीक्षण गृहातून दोन मुले बेपत्ता झाली आहेत़ ही दोन्ही मुले सोळा वर्षांची असून, शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याची नजर चुकवून कोणास काहीही न सांगता ही मुले निघून गेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
राणेनगरला सोनसाखळी खेचली
आईसोबत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी सकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, राणेनगर येथील बंगला नंबर २२ मध्ये राहणाऱ्या कामिनी माणिकराव खेडुलकर (३४) या शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आईसमवेत फिरण्यासाठी जात होत्या़ त्यावेळी समोरून काळ्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने कामिनी खेडुलकर यांचा गळा दाबत त्यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून पळ काढला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Cheating by asking for credit card information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.