कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:04 PM2019-01-18T23:04:36+5:302019-01-19T00:19:23+5:30

‘तुमच्या मुलाला टाटा कंपनीत नोकरी लावून देतो’ असे सांगून त्यामोबदल्यात वृद्धाकडून ९० हजार रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cheating by bribe to hire a company | कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक

कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक

Next

नाशिक : ‘तुमच्या मुलाला टाटा कंपनीत नोकरी लावून देतो’ असे सांगून त्यामोबदल्यात वृद्धाकडून ९० हजार रुपये उकळून फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर दत्तात्रय कुलकर्णी (३५) रा. श्रेयसनगर, गोताजी रोड, सोलापूर असे फसवणूक करणाºया संशयिताचे नाव आहे. त्याने पुण्यातील मानाजीनगर भागातील साद सोसायटीत राहणारे दशरथ बर्डे यांच्या कुटुंबीयांशी ओळख वाढवून, बर्डे यांच्या मुलाला टाटा कंपनीत नोकरीस लावून देतो असे सांगून वेळोवेळी ९० हजार रुपये घेतले. दरम्यान, अनेक वर्षे उलटूनही मुलाला नेकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे बर्डे यांच्या लक्षात आले, त्यांनी कुलकर्णीकडे पैशांची मागणी केली असता, त्याने जिवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली.
दरम्यान दुसºया एका घटनेत फोनवर बोलत पायी चालणाºया इसमाचा मोबाइल दोघांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना मुंबई नाक्याजवळील राष्ट्रवादी भवनासमोर घडली. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्मदिना कॉलनीत राहणारे माजिद इलियास पठाण हे पायी येत होते. राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या समोरून फोनवर बोलत जात असताना दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील दहा हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाइल फोन बळजबरीने खेचून भाभानगर रस्त्याने पळ काढला.

Web Title: Cheating by bribe to hire a company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.