बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:59 AM2019-03-07T00:59:36+5:302019-03-07T01:00:02+5:30

सिन्नर : ‘ओएलएक्स’वर कार पाहून विक्रेत्यांकडून हप्त्याने खरेदी करून तिचे बनावट कागदपत्रे बनवून सदर कार पांगरी येथील एकाला विकणाऱ्या ...

 Cheating by making fake documents | बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक

बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक

Next
ठळक मुद्देवावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिन्नर : ‘ओएलएक्स’वर कार पाहून विक्रेत्यांकडून हप्त्याने खरेदी करून तिचे बनावट कागदपत्रे बनवून सदर कार पांगरी येथील एकाला विकणाऱ्या ठकबाजाविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वसई, पालघर येथील अजयसिंह ऊर्फ पवन राजेश सिन्हा ऊर्फ रोहित राजेंद्रकुमार धवन याने ओएलएक्स व मारुती स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच ४६ बीबी ६१३६) पाहून नवी मुंबई येथील विक्रेत्यांला रोख ५० हजार रुपये देऊन उर्वरित हप्ते फेडण्याचे सांगून कार खरेदी केली होती. त्यानंतर या ठकबाजाने सदर कारचे आरसी बुक, इन्शरन्स कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, एमयूएम करार असे बनावट कागदपत्रे यवतमाळ येथील पुष्पाबाई माधव गुल्हाणे यांच्या नावाने बनवून घेतले. सदर कारची नंबर प्लेट (एमएच २९ बीसी ०४५८) अशी बनवून त्या नावाने आरसी बुक बनवून घेतले. सदर कार राजेंद्र शंकर पगार यांना चार लाख एक हजार रुपयांना विकली.ओएलएक्सच्या माध्यमातून कार विकणाऱ्या विक्रेत्याचे हप्ते न भरले गेल्याने त्याने नवी मुंबई पोलिसांत तक्रार केल्यानंतर वसई, पालघर येथील अजयसिंह ऊर्फ पवन राजेश सिन्हा ऊर्फ रोहित राजेंद्रकुमार धवन या संशयितास ताब्यात घेण्यात आले. त्याचे कॉल रेकॉर्ड काढल्यानंतर पांगरी येथील राजेंद्र पगार यांना कार विकल्याचे उघड झाले. त्यानंतर पगार यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार वावी पोलिसांत दिली.

Web Title:  Cheating by making fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.