वसाका करारात सभासदांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:43 AM2018-09-04T01:43:35+5:302018-09-04T01:43:58+5:30

राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक थांबवावी यासाठी एकत्र यावे, असे आवाहन वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी कळवण येथे पत्रकार परिषदेत ऊस उत्पादक व सभासद बांधवांना केले आहे.

Cheating members of the Vasaka regime | वसाका करारात सभासदांची फसवणूक

वसाका करारात सभासदांची फसवणूक

Next

कळवण : राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक थांबवावी यासाठी एकत्र यावे, असे आवाहन वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी कळवण येथे पत्रकार परिषदेत ऊस उत्पादक व सभासद बांधवांना केले आहे.  कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड कार्यक्षेत्र व अर्थकारण असलेल्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खासगी उद्योगास २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यामागे राज्य सहकारी र्बंक व प्राधिकृत मंडळ यांचे छुपे कट-कारस्थान व षड्यंत्र असून, करारनाम्यातील गृहीतांनुसार हिशेब केला तर हा कार्यकाळ किमान ३०० वर्षांचा होणार असल्याचे देवरे यांनी म्हटले आहे.  सदर करारानुसार केवळ एक कोटी रु पये प्राथमिक खर्च करून सुमारे २५ वर्ष भाडे करार दाखविण्यात येणार आहे. ३५ हजार लिटर्स क्षमतेचा आसवनी व १७ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी प्रतिटन ३०० रु पये दर अपेक्षित असताना केवळ ७५ रु पये टन या दराने हे प्रकल्प घश्यात घालण्यात येत आहेत. प्रतिवर्षी केवळ एक कोटी रु पये कर्जात जमा करण्याच्या धोरणामुळे २६५ कोटींची परतफेड करण्यासाठी किमान ३०० वर्षे लागणार असल्याचे वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.  ऊस उत्पादक कामगार व इतर देणी यांचा सदर करार दरम्यान कोणतेही प्रयोजन नाही, करार सरतेवेळी २५ वर्षांनी इतर देण्यांच्या विचार होणार असल्याने ही ऊस उत्पादक सभासद व कामगारांची फसवणूक होणार आहे. वसाका कारखान्याचे आद्य संस्थापक कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे , माजी अध्यक्ष कै. डॉ. दौलतराव अहेर यांच्या ऊस उत्पादक सभासद व कामगार हिताला प्राधान्य देण्याचे धोरण प्राधिकृत मंडळाचे नियुक्त अध्यक्ष व मंडळ पायदळी तुडवीत सुलतानी पद्धतीने विनामोबदला कारखाना गिळंकृत करीत असल्याने सभासदांनी जागरूकपणे हा डाव उधळून लावावा, असे आवाहन सुनील देवरे यांनी यावेळी केले.  सन २००७ ते २०१६ च्या कार्यकाळात किमान १५० कोटींहून अधिक रकमेची अनियमितता आहे. सदर प्रश्न गंभीर असताना नवीन करारातून ३०० कोटींची शेतकरी मालमत्ता गिळंकृत होत असेल तर करार करणे थांबवा अन्यथा न्यायालयात धाव घेण्याचा इशारा यावेळी देवरे यांनी दिला आहे.  कळवण येथे वसाकासंदर्भात पत्रकार परिषदेत देवरे यांनी सांगितले की, या प्रश्नी राज्य सहकारी बँकेने व वसाका प्राधिकृत मंडळाने खासगी उद्योगाशी करारासंदर्भात वसाका ऊस उत्पादक सभासदांना स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी वसाका बचाव परिषदेने राज्य सहकारी बँकेच्या कार्यकारी मंडळ व वसाका प्राधिकृत मंडळाकडे केली आहे, त्यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. वसाका कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी राज्य सहकारी बँकेने अतिशय गुप्तपणे मागवलेली धाराशीव कारखान्याची निविदा बँकेच्या दि. २३ आॅगस्ट २०१८ च्या सभेत विषय क्र . १८ नुसार मान्य करण्यात आली असून, त्रिपक्षीय करार करण्याचे सूचित केले आहे.

 

Web Title: Cheating members of the Vasaka regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.