गुंगीचे औषध पाजून घराऐवजी प्लॉटचे साठेखत करून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:56 PM2018-09-19T16:56:44+5:302018-09-19T16:59:10+5:30

 Cheating by plagiarizing the plight of the placard instead of the house | गुंगीचे औषध पाजून घराऐवजी प्लॉटचे साठेखत करून फसवणूक

गुंगीचे औषध पाजून घराऐवजी प्लॉटचे साठेखत करून फसवणूक

Next
ठळक मुद्देअंबड पोलीस ठाणे : चहात गुंगीचे औषध सहा संशयितांविरोधात फसवणुकीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

नाशिक : चहात गुंगीचे औषध टाकून घराऐवजी प्लॉटचे साठेखत करून सहा संशयितांनी एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

प्रवीणचंद दत्ताराम देठे (रा़ तेजल क्लासिक सोसायटी,पाथर्डी फाटा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सिडकोतील खांडे मळा येथे प्लॉट (सर्व्हे नंबर ९८९/१ अ/१२) आहे़ संशयित सूर्यकांत सोनवणे (रा. सनराइज अपार्टमेंट, शिवपॅलेस हॉलच्या मागे, पेठ रोड), संदीप बेंडाळे (रा. विजय-ममता टॉकीजसमोर), हेमंत गायकवाड (रा. खांडे मळा, सिडको), मयूर ताजणे (रा. खांडे मळा, सिडको), प्रवीण गायकवाड व प्रशांत शेवाळे यांनी रद्द झालेल्या विसार पावतीचा वापर केला़ या संशयितांनी देठे यांच्या चहात गुंगीचे औषध टाकून सिडकोतील घराऐवजी त्यांच्या खांडे मळ्यातील प्लॉटचा साठेखत करारनामा करून घेत फसवणूक केली.

१० डिसेंबर २०१५ ते १० सप्टेंबर २०१८ या कालावधीत संशयितांनी देठे यांच्या प्लॉटवर खासगी बिल्डरच्या नावाचा फलक लावून हा प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी हा बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला असता संशयित प्रवीण गायकवाड, हेमंत गायकवाड, मयूर ताजणे व प्रशांत शेवाळे यांनी जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केली.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयितांविरोधात फसवणुकीसह जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  Cheating by plagiarizing the plight of the placard instead of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.